05 जानेवारी, रांची : चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांची शिक्षा, 5 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टाने लालू प्रसाद यादव यांना ही शिक्षा सुनावलीय. इतर तीन आरोपींनाही लालू इतकीच शिक्षा सुनावण्यात आलीय. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लालूं यांना हा निकाल ऐकवण्यात आला. न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी आज चारा घोटाळ्याचा निकाल दिला. दरम्यान, या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं आरजेडीकडून स्पष्ट करण्यात आलंय. भाजपनेच लालू प्रसाद यादव यांना विनाकारण या घोटाळ्यात अडकवल्याचा आरोपही लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेजस्वी यादव यांनी केलाय.
Lalu gets 3.5 yrs of jail in fodder scam case
Read @ANI story | https://t.co/wY5fE3KTAO pic.twitter.com/f9WLfdiYck — ANI Digital (@ani_digital) January 6, 2018
The judiciary performed its duty. We will go to the High Court after studying the sentence and apply for a bail: Tejashwi Yadav, RJD on #FodderScam pic.twitter.com/17zxjyTQ2d
— ANI (@ANI) January 6, 2018
1991 ते 1994 या काळात लालू प्रसाद बिहारचे मुख्यमंत्री असताना हा चारा घोटाळा झाला होता. त्यातल्या दुसऱ्या खटल्यात लालूंना आज शिक्षा झालीय. यापूर्वीच्या चारा घोटाळ्यातही लालू प्रसाद यादव यांना 5 वर्षांची शिक्षा झाली होती.
लालू प्रसाद यांनी केलेल्या घोटाळ्यातील एका खटल्यात स्पेशल सीबीआय कोर्टाने लालूंना दणकाच दिला होता. 1991-1994 या काळात 85 लाखांचा चारा घोटाळा झाला होता. या चारा घोटाळ्याच्या दुसऱ्या खटल्यातही लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलं. लालू प्रसाद वगळता इतर सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. कोर्टाने लालूप्रसाद यादव यांची 1990 च्या नंतरची संपत्तीही जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आताच्या खटल्यात लालूंना सीबीआय काय शिक्षा देतं यावरच सगळ्यांचं लक्ष असेल.
चारा घोटाळा नेमकं प्रकरण काय ?
चारा घोटाळा पहिल्यांदा 1996 साली समोर आला. यामध्ये बिहारच्या पशुपालन विभागात करोडो रुपयांचा घोटाळ्याचा खुलासा झाला. 1990 ते 1997 दरम्यान लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यात कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याचं आरोप आहे. चारा घोटाळ्यात 3 वेगवेगळी प्रकरण असून तिन्हीही प्रकरणात लालू प्रसाद यादव आरोपी आहेत. या तीन प्रकरणापैकी एका प्रकरणात जरी लालू प्रसाद यादव दोषी आढळले तर त्यांना तुरूंगात जावं लागणार आहे. सीबीआयने तपासात लालू प्रसाद यांना आधीच दोषी ठरवलं आहे.
लालू प्रसाद यादव पहिल्यांदा चारा घोटाळ्यामुळे तुरूंगात गेले होते. त्यावेळी लालू प्रसाद यादव पत्नीला बिहारचं मुख्यमंत्रीपद देऊन तुरूंगात गेले. त्यावेळी याचा कुठलाही परिणाम लालू प्रसाद यादव यांच्या पक्षावर झाला नाही. पण आता परिस्थिती वेगळी आहे. कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर 2013मध्ये लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. लालू प्रसाद यादव यांचं लोकसभेचं सदस्यत्व काढून घेतलं होतं. तसंच त्यांना 11 वर्ष कुठलीही निवडणूक लढविण्यावर बंद घातली होती.
चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय आरोपींमध्ये बिहारचे माजी मंत्री जगन्नाथ मिश्र यांच्यासह विद्यासागर निषाद, आर के राणा, घ्रुल भगत, आयएए अफसर महेश प्रसाद यांसारख्या नेत्यांचाही सहभाग आहे. या प्रकरणातील सात आरोपींचा मृत्यू झाला तर दोन आरोपी सरकारी साक्षीदार बनले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.