...अन् पॉप स्टार लेडी गागाने मोडला साखरपुडा

लेडी गागाच्या फार कमी चाहत्यांना माहीत आहे की ती एलजीबीटी कम्युनिटीची सपोर्टर आहे.

  • Share this:

हॉलिवूड रॉकस्टार लेडी गागाने तिचा साखरपुडा मोडला. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तिने क्रिश्चियन कारिनोशी साखरपुडा केला होता. आता पीपल डॉट कॉम या वेबसाइटला गागाच्या सेक्रेटरीने तिचा साखरपुडा मोडला असल्याचं वृत्त खरं असल्याचं सांगितलं.

लेडी गागा म्हणाली की, काही नाती ही अचानक संपून जातात. २००५ ते २००८ पर्यंत गागाने संगीतकार ल्यूक कार्लला डेट केलं. त्यानंतर २०११ मध्ये तिचं नाव अभिनेता टेलर किन्नीशी जोडलं गेलं. दोघं लवकर लग्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र असे काही झाले नाही.

लेडी गागा ही आंतरराष्ट्रीय दर्जाची पॉप सिंगर आहे. तिचं मूळ नाव स्टेफनी जोआन एंजेलीना जर्मानोत्ता असं आहे. २००३ मध्ये लेडी गागाने करिअरला सुरुवात केली.

आजच्या तारखेपर्यंत अनेक पुरस्कारांवर तिने आपलं नाव कोरंल आहे. ग्रॅमी पुरस्कारासाठी तिला ११ वेळा नामांकन मिळालं आहे. तसंच दोनवेळा तिचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आलं आहे. गायनाशिवाय गागाला बेली डान्सचीही फार आवड आहे.

लेडी गागाच्या फार कमी चाहत्यांना माहीत आहे की ती एलजीबीटी कम्युनिटीची सपोर्टर आहे. २०१२ मध्ये गे आणि लेस्बियन यांच्यासाठी एक विशेष निधी सुरू करण्यात आला होता. निधी गोळा करण्यात लेडी गागाची मुख्य भूमिका होती.

गागा नेहमीच सामाजिक सेवा करणाऱ्याला प्राधान्य देते. ती अनेक सामाजिक उपक्रमांना देणग्या तर देतेच शिवाय अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागही घेते.

१० फेब्रुवारी २०१९ मध्ये जगातील सर्वात मोठा संगीत पुरस्कार अर्थात ग्रॅमी अवॉर्ड्सचं आयोजन लॉस ऐंजेलिसच्या स्टेपल्स सेंटरमध्ये पार पडला होता. या संगीत समारोहात नावाजलेल्या कलाकारांनी लाइव्ह परफॉर्मन्स दिला होता.

या संगीत सोहळ्यात चाइल्डिश गैम्बिनो, लेडी गागा, केसी मसग्रेव्स आणि ब्रैंडी कारलाइल यांसारख्या सेलिब्रिटींनी अनेक पुरस्कारा आपल्या नावावर केले.

या कार्यक्रमात दिवंगत अमेरिकन संगीतकार आणि गायक क्रिस कोरनेल यांच्या when bad does good या गाण्याच्या संगीताला सर्वोत्कृष्ट रॉक परफॉर्मन्स म्हणून गौरविण्यात आले.

एरियाना ग्रांडेने तिच्या करिअरमधील पहिला ग्रॅमी अवॉर्ड स्वतःच्या नाववर केला. एलिसिया कीजने या सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं होतं तर लेडी गागाला सर्वोत्कृष्ट पॉप जोडी आणि सर्वोत्कृष्ट ग्रृप परफॉर्मन्ससाठी हा पुरस्कार मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 10:29 AM IST

ताज्या बातम्या