बेळगावात पुन्हा मराठी-कन्नड वादाची शक्यता, विमानतळाचं नाव बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं पत्र

बेळगावात पुन्हा मराठी-कन्नड वादाची शक्यता, विमानतळाचं नाव बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं पत्र

बेळगावात अनेकदा मराठी विरुद्ध कन्नड असा वाद समोर आला आहे. अशातच आता या नव्या मागणीने या वादात भर पडण्याची शक्यता आहे.

  • Share this:

बंगळुरू, 23 डिसेंबर : देशभरात सध्या ठिकाणांचं नाव बदलण्याची स्पर्धा सुरू आहे. अशातच आता मराठीबहुल बेळगावातही एक नवा वाद तयार झाला आहे. कारण कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी बेळगाव विमानतळाचं नाव बदलण्याची मागणी करत केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे.

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना पत्र लिहित बेळगाव विमानतळाचं नाव 'राणी कित्तुर चन्नमा' असं करण्याची मागणी केली आहे. तसंच हुबळी विमानतळाचं 'संगोळी रायन्ना' असं नामांतर करावं, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

बेळगावात अनेकदा मराठी विरुद्ध कन्नड असा वाद समोर आला आहे. अशातच आता या नव्या मागणीने या वादात भर पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नामांतर करण्याचा धडका लावला आहे. त्याचीच री ओढत आझमी यांनी राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्याचे नाव बदलण्याची मागणी केली होती.

संभाजी ब्रिगेडनेही याआधी पुणे शहराला जिजापूर असं नावं द्यावी अशी मागणी केली होती. संभाजी ब्रिगेडच्या मागणीवरुन मोठा गदारोळ झाला होता.

..आणि पोलीस अधिकाऱ्यानेच रोखली व्यापाऱ्यांवर बंदूक; काय घडलं पहा VIDEO

First published: December 23, 2018, 1:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading