कर्नाटकातलं खातेवाटप लांबणीवर, कुमारस्वामींनी घेतली पंतप्रधानांची भेट

कर्नाटकातलं खातेवाटप लांबणीवर, कुमारस्वामींनी घेतली पंतप्रधानांची भेट

कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली.

  • Share this:

नवी दिल्ली,ता.28 मे : कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. ही सदिच्छा भेट असल्याचं कुमारस्वामी यांनी सांगितलं. कर्नाटकच्या विकासासाठी सर्व सहकार्य करणार असल्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचं कुमारस्वामी यांनी सांगितलं.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे सोनिया गांधी यांच्या रूटीन चेकअपसाठी विदेशात गेल्याने कर्नाटकमधलं खातेवाटप लांबणीवर पडलं आहे. पुढच्या आढवड्यात खातेवाटप होईल अशी माहिती आहे.

चांगली वजनदार खाती मिळावी यासाठी दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असून मतभेद उफाळून येण्याची शक्यता आहे.

First published: May 28, 2018, 8:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading