कुल्लू, 8 ऑगस्ट : हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्ण घाटाच्या ब्रम्हगंगामध्ये ढगफुटी (Cloud Burst) मुळे 28 जुलै रोजी भयंकर पूर आला होता. यामध्ये 25 वर्षीय पूनम बेपत्ता झाली होती. तब्बल 11 दिवसांनी महिलेचा मृतदेह सापडला आहे. पूनमच्या नातेवाईकांनी पंडोहमध्ये जाऊन मृतदेहाची (Dead Body) ओळख पटवली. ज्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोस्टमार्टमनंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात आला आहे. (Kullu Flash Flood)
एसपी मंडी शालिनी अग्निहोत्री यांनी प्रकरणाची पुष्टी करीत सांगितलं की, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. मात्र अद्याप पुनमचा 4 वर्षांचा मुलगा सापडलेला नाही. पोलीस मुलाचा शोध घेत आहे.
हे ही वाचा-VIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...
कुल्लू जिल्ह्यात पूनम (25) आणि तिचा चार वर्षांचा मुलगा निकुंज पार्वती नदीला जोडणाऱ्या ब्रह्म गंगा नाल्यात वाहून गेले होते. ही सकाळी 6 वाजेदरम्यानची घटना आहे. दोघे नाला पार करीत होते. यादरम्यान पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोघेही वाहून गेले. मणिकर्ण घाटात ब्रह्म गंगा नाल्यात पाण्याची पातळी वाढल्याने अनेक घरांचं नुकसान झालं आहे. स्थानिक प्रत्यक्षदर्शिंनी सांगितलं की, महिला आपल्या मुलाला पाठीवर टाकून पळत होती. त्यात पाण्याचा प्रवाह वाढल्याने ती त्यात वाहून गेली. आणि बेपत्ता झाली. अनेक दिवस महिलेचा शोध घेण्यात आला होता. यातील अनेकांनी डोंगरावर चढून आपला जीव वाचवत होते. तर पूनम नाला पार करण्याचा प्रयत्न करीत होती. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनंतर पाण्याचा प्रवाह कमी झाला. गावाील घरांच्या खालच्या मजल्यापर्यंत पाणी भरलं होतं. त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Himachal pradesh