कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आदेश अमान्य

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आदेश अमान्य

  • Share this:

13 मे : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेतली आहे. पाकिस्तानने कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला आदेश अमान्य केला आहे. पाकिस्तानचे अॅटॉर्नी जनरल यांनी हा आदेश अमान्य असल्याचं सांगितलं आहे.

आंतराराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. मात्र हे आदेश अमान्य असल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे.

कुलभूषण जाधव प्रकरणी आंतराराष्ट्रीय न्यायालयत 15 मेपासून सुनावणी होणार आहे. या सुनावणीचे थेट प्रक्षेपण केले जाईल, अशी अधिकृत माहिती संयुक्त राष्ट्राकडून देण्यात आली आहे.

कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा ही व्हिएन्ना करारच्या विरोधात असल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाला सांगितलं आहे. महत्वाचे म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या वेब टीव्हीवरुन या सुनावणीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2017 03:37 PM IST

ताज्या बातम्या