Home /News /news /

कुलभूषण जाधव यांच्याबद्दल पाकिस्तानचा खोटा दावा - भारतीय परराष्ट्र मंत्रालय

कुलभूषण जाधव यांच्याबद्दल पाकिस्तानचा खोटा दावा - भारतीय परराष्ट्र मंत्रालय

कुलभूषण जाधव यांनी पुनरावलोकन याचिका मागे घेण्यास नकार दिला आहे, हा पाकिस्तानचा दावा खोटा असल्याचं मंत्रायलानं म्हटलं आहे.

    नवी दिल्ली, 08 जुलै : कुलभूषण जाधव (Kulbhooshan Jadhav)प्रकरणात पाकिस्ताननं केलेल्या दाव्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं ((Ministry Of External Affairs) प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये भारत आंतरराष्ट्रीय न्यायालयीन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करत आहे, असं विधान परराष्ट्र मंत्रालय जारी केलं आहे. कुलभूषण जाधव यांनी पुनरावलोकन याचिका मागे घेण्यास नकार दिला आहे, हा पाकिस्तानचा दावा खोटा असल्याचं मंत्रायलानं म्हटलं आहे. कुलभूषण जाधव हे 2016 पासून पाकिस्तानच्या तुरूंगात आहेत. कुलभूषण जाधव हे हेरगिरी करणारा असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. पण हा दावा भारतानं बर्‍याच वेळा नाकारला आहे. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली पाकिस्तानी सुरक्षा दलांनी 3 मार्च 2016 रोजी बलुचिस्तानला कुलभूषण यांना अटक केली. सन 2017 मध्ये भारतानं आयसीजेकडे हे प्रकरण सोपावलं. गेल्या वर्षी जुलै महिन्यात कोर्टानं पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांना कॉन्सुलर प्रवेश (Consular Access)देण्याची आणि फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्यास सांगितलं. बॉलीवूडवर पुन्हा एकदा शोककळा, शोले सिनेमातील सुरमा भोपालींचं निधन पाकिस्तानची कायदेशीर यंत्रणा ही सैन्य शासित आणि सरकार शासित आहे आणि त्यांच्याकडे कोणत्याही कायदेशीर चौकटीचे किंवा आंतरराष्ट्रीय मापदंडांचे कोणतेही मूल्य नाही. त्यामुळे जाधव प्रकरणातील सर्व दरवाजे उघडे आहेत. पाकिस्तानचा कोणताही निर्णय किंवा आदेश हा आयसीजेच्या निदर्शनात आणला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. भाजप जिल्हाध्यक्षांवर दहशतवादी हल्ला, वडिल आणि भावासह तिघांचा मृत्यू दरम्यान, मध्यंतरी 3 मे रोजी कुलभूषण जाधव यांना परत आणण्यासाठी बॅक चॅनलवरून सरकारला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न झाला असल्याचा खुलासा ज्येष्ठ वकिल हरीश साळवे यांनी केला होता. या प्रकरणात साळवे आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) भारतीय समुपदेशक होते. ते भारताचे माजी सॉलिसिटर जनरल देखील आहेत. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या कोर्टानं एप्रिल 2017मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्ताननं त्यांच्यावर भारताचे हेरगिरी असल्याचा आरोप केला आहे. 8 पोलिसांची हत्या करणारा गँगस्टर विकास दुबे मीडियासमोर करणार सरेंडर, शहरात अलर्ट 'आम्ही आशा केली की, जर मागच्या दाराने त्यांनी पाकिस्तानशी चर्चा केली तर आम्ही त्यांना पटवून देऊ. आम्ही त्यांना मानवतेच्या आधारे सोडून देण्याविषयी बोलत होतो. पण तसं झालं नाही. वास्तविक कुलभूषण जाधव यांचं प्रकरण पाकिस्तानसाठी प्रतिष्ठेचा विषय बनलं होतं.' असंही साळवे यांनी सांगितलं होतं. संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या