मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

हार्दिक-नताशाचा साखरपुडा हा ‘वेडेपणा’, कृणाल पांड्याने ट्वीट केला नवा फोटो

हार्दिक-नताशाचा साखरपुडा हा ‘वेडेपणा’, कृणाल पांड्याने ट्वीट केला नवा फोटो

मॉडेल गर्लफ्रेंड नताशा स्टानकोविचबरोबर आपण 'Engaged' असल्याचं भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने रोमँटिक पद्धतीने जाहीर केलं

मॉडेल गर्लफ्रेंड नताशा स्टानकोविचबरोबर आपण 'Engaged' असल्याचं भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने रोमँटिक पद्धतीने जाहीर केलं

मॉडेल गर्लफ्रेंड नताशा स्टानकोविचबरोबर आपण 'Engaged' असल्याचं भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने रोमँटिक पद्धतीने जाहीर केलं

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 03 जानेवारी : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. हार्दिक आणि नताशा स्टान्कोविच (Hardik Pandya and Natasa Stankovic Engagement) यांना अभिनय आणि क्रिकेट क्षेत्रातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही पांड्याचे अभिनंद केले. मात्र हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्याने केलेली कमेंट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहली म्हणाला, ‘शॉक दिलास’

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने हार्दिक पांड्या आणि नताशा स्टान्कोविचचे अभिनंदन करताना ट्विट केले की, 'हार्दिक अभिनंदन, काय आनंददायी आश्चर्य आहे? भविष्यासाठी शुभेच्छा. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीसह आयपीएल टीम मुंबई इंडियन्सनेही हार्दिक आणि नताशाचे अभिनंदन केले. हार्दिकने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळला होता.

वाचा-VIDEO - हार्दिकचं ठरलं! 'एंगेज्ड' झाल्याचं 'साऱ्या हिंदुस्तान'ला असं कळवलं

 
View this post on Instagram
 

Mai tera, Tu meri jaane, saara Hindustan. 01.01.2020 ❤️ #engaged

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

वाचा-हार्दिक- नताशाचे एंगेजमेंटचे फोटो बघून Ex बॉयफ्रेंड म्हणाला...

‘वेडेपणाच्या जगात आपले स्वागत आहे’

हार्दिकनं सोशल मीडियावर एंगेजमेंटचा रोमँटिक VIDEO टाकला होता. यावेळी हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्याही उपस्थित होता. मात्र पांड्याने एक नवा फोटो ट्विट करत, 'हार्दिक आणि नताशाचे अभिनंदन. नताशा, आम्हाला आनंद झाला की तु आमच्या वेड्या कुटुंबात सामील झाली आहेस. वेडेपणाच्या जगात आपले स्वागत आहे. तुम्ही दोघांना खूप प्रेम’. या ट्विटसह, क्रुणाल पंड्या यांनी हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविचबरोबर स्वत: चे एक चित्रही शेअर केले आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये क्रुणाल आणि हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरले आहेत.

वाचा-DJ'वाल्या गर्लने धकधक वाढवली, हार्दिक पांड्याने फोटो शेअर करत दिली कबुली

'साऱ्या हिंदुस्तान'ला कळवलं

नव्या वर्षाच्या आधी हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवर नताशासोबत एक फोटो शेअर केला होता. पण 1 तारखेला संध्याकाळी त्याने आणखी काही फोटो शेअर करत आपली कमिटमेंट सिद्ध केली. Mai tera, Tu meri jaane, saara Hindustan. 01.01.2020 ❤️ #engaged असं लिहित त्यानं फोटो शेअर केले आहेत. रोमँटिक गाण्याच्या सुरात दोघं नाचताना दिसत आहेत. हार्दिकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नताशा आणि हार्दिक नवीन वर्षाची सुरुवात अशा रोमँटिक अंदाजात करताना दिसले. पांड्याने सकाळी शेअर केलेल्या फोटोसोबत एक कॅप्शन दिली होती. त्यात म्हटलं होतं की, नव्या वर्षाची सुरुवात माझ्या 'फायरवर्क'सोबत. यासोबत त्याने लव्हचा इमोजीसुद्धा शेअर केला होता. त्याच्या या फोटोवर भारताच्या क्रिकेटपटूंसह पांड्याच्या मित्र-मैत्रीणींनी कमेंट केल्या. त्यानंतर संध्याकाळी हार्दिक हार्दिकने आणखी काही फोटो शेअर केले.

First published:

Tags: Hardik pandya, Natasha