मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /हे कोचिंग क्लासचं शहर रूप पालटणार; देशातलं पहिलं सिग्नलमुक्त शहर बनण्यासाठी 700 कोटींचा प्लॅन तय्यार

हे कोचिंग क्लासचं शहर रूप पालटणार; देशातलं पहिलं सिग्नलमुक्त शहर बनण्यासाठी 700 कोटींचा प्लॅन तय्यार

700 कोटी रुपये खर्च करून या शहराचं रूप पालटणार आहे. जगात यापूर्वी फक्त एकच सिग्नलमुक्त शहर अस्तित्वात आहे. आता त्यात या शहराची भर पडेल आणि देशातलं ते पहिलंच स्मार्ट शहर बनेल.

700 कोटी रुपये खर्च करून या शहराचं रूप पालटणार आहे. जगात यापूर्वी फक्त एकच सिग्नलमुक्त शहर अस्तित्वात आहे. आता त्यात या शहराची भर पडेल आणि देशातलं ते पहिलंच स्मार्ट शहर बनेल.

700 कोटी रुपये खर्च करून या शहराचं रूप पालटणार आहे. जगात यापूर्वी फक्त एकच सिग्नलमुक्त शहर अस्तित्वात आहे. आता त्यात या शहराची भर पडेल आणि देशातलं ते पहिलंच स्मार्ट शहर बनेल.

  नवी दिल्ली, 18 जानेवारी: भारतातील सर्वात मोठे कोचिंग क्लास सेंटर असलेलं कोटा(Kota) शहराचे लवकरच रुपडं बदलणार आहे. राजस्थानमधील कोटा हे शहर कोचिंग क्लाससाठी(Coaching Class) मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. भारतातील अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिकण्यासाठी येत असतात. परंतु आता या शहराचे रूप बदलण्यासाठी नवीन योजनेची घोषणा करण्यात आली असून नगरविकासमंत्री शांती धारीवाल यांनी या नवीन योजनेची घोषणा केली आहे.

  चंबल रिवर फ्रंट (Chambal River Front) असे या नवीन योजनेचे नाव असून यामाध्यमातून शहराचा मोठ्या प्रमाणात विकास केला जाणार आहे. याचबरोबर हे शहर ट्रॅफिक सिग्नलमुक्त (Traffic signal free city) होणार असून यामुळे भारतातील हे पहिले आणि जगभरातील दुसरे सिग्नलमुक्त शहर ठरणार आहे. शहर सिग्नल आणि ट्रॅफिकमुक्त करण्यासाठी फ्लायओवर (Flyover) आणि अंडरपास किंवा एलिवेटेड रोड बनवले जाणार आहेत. याचबरोबर या ठिकाणी जगभरातील सर्वात मोठी घंटा देखील बसवली जाणार आहे. या योजनेसाठी 700 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. देशभरातील शैक्षणिक शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या कोटा शहरात श्रीमद्भगवदगीतेच्या श्लोकांवर आधारित शिल्पे तसेच हडा राणी आणि पन्नाध्याय कथा तसेच सिंह आणि मगरींची मोठी शिल्प बसवली जाणार आहेत. मेवाड, मारवाड, शेखावाटी आणि हडोटी ग्लेज्ड स्ट्रक्चर्स आणि हेलिकॉप्टर सवारी हे चंबळ रिव्हर फ्रंटचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत.

  कोटा बैराज ते नयापुरा पर्यंत हा चंबल रिवर फ्रंट प्रकल्प उभारला जाणार आहे. यामुळे शहराच्या पर्यटनाला चालना मिळणार असून अनेक चौकांमध्ये, घाटांवर राजस्थानी शिल्पांच्या आकृत्या बनवल्या जाणार आहेत. हेलिकॉप्टर राईडच्या(Helicopter Ride) माध्यमातून देखील कोटा शहराचे दर्शन करता येणार आहे. यामुळे कोटा शहराच्या विकासात आणि वैभवात देखील भर पडणार आहे. भारतातील सर्वात सुंदर हे ठिकाण बनणार असून जगभरातील पर्यटक हे पाहण्यासाठी येतील.

  या प्रकल्पामध्ये ही महत्त्वाची विकासकामे होणार

  1) या योजनेअंतर्गत साहित्य घाटावर  तुलसीदास, प्रेमचंद आणि गालिब यांच्यारचनांची शिल्प बसवली जाणार. याचबरोबर ग्रंथालय देखील तयार केलं जाणार आहे.

  2) भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या हाडा राणी आणि पन्नाध्यायची कहाणी इतिहास उद्यानात प्रदर्शितकरण्यात येणार आहे.

  3) सिंह घडियाल घाटावर 15 सिंह आणि मगरींची शिल्प बसवण्यात येणार

  4) मेवाड, मारवाड, शेखावाटी आणि हडोटी ग्लेज्ड स्ट्रक्चर्स महाराणा घाटावर बसवण्यात येणार

  5) छत्री घाटावर लाल दगडाचा मोठा नंदी बसवण्यात येणार

  6) संगीत घाटावर संगीत कार्यक्रमांचे आयोजन करता येणार

  7) झाडांवर लाईट्स लावण्यात येणार असून लहान मुलांसाठी वॉटर गेम झोन देखील बनवण्यात येणार

  8) घंटाघर घाटावर 9.5 मीटर व्यासाची जगभरातील सर्वात मोठी घंटा बसवली जाणार. मॉस्कोमधील 8 मीटर व्यास असणाऱ्या घंटेपेक्षा मोठी घंटा याठिकाणी बसवली जाणार

  9) रिव्हर फ्रंटवर मनोरंजनासाठी विविध साहित्य तयार केलं जाणार. याचबरोबर संगीतावर चालणारे कारंजे मुख्य आकर्षण

  10) जवाहर घाटावर जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टॉवर तयार केला जाणार. जयपूरमधील प्रसिद्ध वास्तुकार अनुप बरतरिया यांचे डिझाईन तयार करणार.

  11) चंबळ नदीच्या काठावर माता चर्मण्यवतीची 40 फूट उंच मूर्ती स्थापित केली जाणार

  12) सुंदर हस्तकला बाजार आणि सुंदर बाग विकसित करण्यात येणार

  13)  या ठिकाणी तयार करण्यात येणाऱ्या फूड कोर्टमध्ये जगभरातील विविध देशांच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार

  First published: