'...म्हणून मोदींना मतदान करू नका'; कोंकणा, नासीर, अमोल पालेकरसह 700 कलाकारांनी केलं 'हे' आवाहन

भाजपविरोधात मतदान करण्यासाठी आवाहन करणाऱ्यांमध्ये कोण आहेत यातले मुख्य कलाकार?

News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2019 05:12 PM IST

'...म्हणून मोदींना मतदान करू नका'; कोंकणा, नासीर, अमोल पालेकरसह 700 कलाकारांनी केलं 'हे' आवाहन

देशात लोकसभेच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे. यातच 600 पेक्षा जास्त कलाकारांनी समानता आणि सामाजिक न्यायाला मत देण्याचं आणि असभ्य, एकाधिकाराला नाकारण्याचे आवाहन केलं आहे.

सर्व कलाकार मंडळींनी एकत्र येऊन जाहिर केलेल्या पत्रकात संविधान सुरक्षित राखण्यासाठी आणि धर्मनिरपेक्ष अबाधित ठेवण्यासाठी मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

कलाकारांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकावर जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर, अरुंधती नाग, अस्ताद देबू, अरिशा सत्तार, दानिश हुसेन, गिरिश कर्नाड, नसरुद्दिन शहा, एम.के. रैना, कविता लंकेश, कोंकणा सेन शर्मा, नवतेज जोहर यांच्या स्वाक्षरी आहेत.

Loading...

पत्रकात म्हटले आहे की, भारताच्या रंगकर्मींनी कामातून वेळोवेळी संस्कृती आणि विवधता मांडली आहे. स्वातंत्र्य लढ्यातही अनेक रंगकर्मींनी सहभाग घेतला. सामाजिक प्रश्नांवर भाष्य केलं. जाती आधारित व्यवस्था आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवला.

धार्मिक फुटीरतावाद, कट्टरता, संकुचितपणा, अविवेकीपणा या विरुद्ध नेहमीच नाट्य कलाकार उभे राहिले आहेत. गाणी, नृत्य, विनोद, नाटके, यातून गेली दीडशे वर्षे  धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी, न्याय्य, सर्वसमावेशक आणि सार्वभौम भारताची बाजू मांडली आहे.

भारताचे हेच सार्वभौमत्त्व धोक्यात आलं आहे. संविधानही यातून सुटलेलं नाही. प्रश्न विचारणं, सत्य बोलण्याला राष्ट्रद्रोह ठरवलं जात आहे. द्वेषाची बीजे संस्कृतीत रुजवण्याचा प्रकार होत असल्याचं कलाकारांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

आगामी निवडणूक ही भारताच्या इतिहासातील सर्वाधिक संवेदनशील निवडणूक आहे. लोकशाहीने दुर्बल घटकांना सक्षम करायला हवे पण सध्याच्या सरकारने याविरुद्ध काम केलं आहे. विकासाच्या स्वप्नाआडून हिंदुत्त्ववाद, द्वेष आणि हिंसेचं राजकारण चाललं असल्याचा आरोप या कलाकारांनी केला आहे.

कलाकारांनी आवाहन केलं आहे की, भारताचे संविधान, सहिष्णू आणि धर्मनिरपेक्ष वातावरणाचे रक्षण करूया. प्रेम, करुणा, समता, सामाजिक न्यायाला मत द्या आणि देशाला अंधारात ढकलणाऱ्यांना पराभूत करा असंही पत्रकात म्हटलं आहे.

भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या विरोधात मतदान करा. स्वप्न पाहण्याच्या स्वातंत्र्यासाठी मतदान करा. विवेकाने मतदान करा असं या पत्रकात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2019 04:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...