PHOTOS: चिमुकलीने दिलं शरद पवारांना सगळ्यात मोठं बर्थडे गिफ्ट, केलं 1800 फूट रॅपलिंग आणि...!

आत्तापर्यंत सह्याद्री रांगेतील अनेक गड-किल्ले सर केले आहेत. लिंगाणा गड हा अत्यंत अवघड श्रेणीतील समजला जाणारा गड तिने सर केला आहे.

  • Share this:

हिरकणीने आपल्या तान्ह्या बाळासाठी रायगडाचे सायंकाळी दरवाजा बंद झाल्यानंतर अत्यंत अवघड टप्पा उतरून, ज्या ठिकाणाहून फक्त पाण्याचा प्रवाहचं खाली जाऊ शकतो असा वाट उतरून तिच्या घरी पोहचली. आज रायगडच्या या वाटेला हिरकणी बुरुज म्हणून ओळखले जाते.

साडेतीनशे वर्षांपूर्वी अशा रणरागिणी आपल्या स्वराज्यात होत्या. त्यानंतर काळ बदलत गेला, मुलींना घराबाहेर पाठविले जात नसे. शालेय शिक्षण ही घेऊ दिले जात नसे. महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी प्रथम मुलींसाठी शाळा सुरू केली. त्यानंतर समाज हळूहळू बदलत जाऊ लागला. आज मुलांबरोबरच मुलींना ही समान वागणूक दिली जात आहे.

सह्याद्रीच्या कडे-कपाऱ्यात आज रणरागिणी स्वच्छंद भटकंती करताना विविध गडांवर, मोहिमेवर सहभागी होतात. अशाच एका रणरागिणीने एक अदभूत आणि अविस्मरणीय अशी कामगिरी केली आहे. हिचे नाव आहे स्वानंदि सचिन तुपे (वय वर्ष 9). लोणी काळभोर कुंजीर वाडी येथे राहणारी, एम.आय.टि शाळेत चौथीमध्ये शिकत आहे.

तिने आत्तापर्यंत सह्याद्री रांगेतील अनेक गड-किल्ले सर केले आहेत. लिंगाणा गड हा अत्यंत अवघड श्रेणीतील समजला जाणारा गड तिने सर केला आहे. तिचे वडील सचिन तुपे व काका पंडित झेंडे यांच्या बरोबर तिची भटकंती सुरू असते.

9 डिसेंबरला खीरेश्वर येथुन सायंकाळी सहा वाजता तिने हरिश्चंद्र गड चढण्यास सुरुवात केली. रात्री साडे नऊ वाजता ती गडावर पोहचली. तेथे रात्रीचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी 10 डिसेंबरला पहाटे कोकण कड्यावर पोहचली. सकाळी साडे नऊच्या दरम्यान ती आणि तिचे वडील सचिन तुपे यांनी कोकणकड्यावरून रॅपलिंग करायला सुरुवात केली.

पहिला टप्पा हा नवशे फुटांचा पार करायला तिला अर्धा तास लागला. हा टप्पा पूर्ण करत लटकत खाली जाणं असा आहे. त्यानंतर दुसरा टप्पा हा सहाशे फुटांचा आहे. तो तिने दहा मिनिटांत पार केला.

तिसरा टप्पा तीनशे फुटांचा आहे. हा टप्पा सोपा आहे, तिने आठ मिनिटांत पार केला. येथुन पुढे खरी कसरत चालू झाली. बेलपाडापर्यंत जाणारा वाट अतिशय अवघड असा आहे.

वाटेमधे मोठी दगडांची वाट पार करून जावं लागतं. खरंतर वाट अशी नाहीच, अंदाजे दगडांवर पाय ठेऊन जिथे वाट दिसेल तिथे पाय रोऊन जावं लागत होतं. जवळपास साडे पाच तासांचे पदभ्रमण करून रात्री साडे नऊ वाजता बेलपाडा येथे पोहचली.

या मोहिमेचे आयोजन अनिल वाघ यांनी केले. त्याच्या बरोबर दीपक विशे, सिंघम आणि गणेश गायकवाड यांनी अनिल यांना साथ दिली. एकूण दहा सदस्यांनी कोकण कडा हा 1800फुटांचा टप्पा रॅपलिंग करीत पार केला. पंडित झेंडे हे सुध्दा या मोहिमेत सहभागी झाले होते.

अशा पद्धतीने अवघ्या नऊ वर्षाच्या हिरकणी स्वानंदि सचिन तुपे हिने 'न भूतो न भविष्यती' मोहीम  शरद पवार साहेबांचा 12 डिसेंबरला असणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाडली. या ठिकाणी प्रथमच नऊ वर्षाच्या मुलीने 1800 फुटांचे रॅपलिंग केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2019 02:12 PM IST

ताज्या बातम्या