Home /News /news /

मुलाला सारखा सुरू होता खोकला, सीटीस्कॅन रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टरही हैराण

मुलाला सारखा सुरू होता खोकला, सीटीस्कॅन रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टरही हैराण

12 वर्षांच्या मुलाला सतत सुरू होता खोकला, सीटीस्कॅनच्या रिपोर्टने डॉक्टरांची उडाली झोप

    कोलकाता, 26 जानेवारी: लहान मुलांना प्रत्येक गोष्ट तोंडात घालण्याची सवय असतेच. मात्र पालकांनी वेळीच त्यांच्यातकडे लक्ष दिलं नाही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आणि डॉक्टरांनाही धक्का बसला. 12 वर्षांच्या मुलाला वारंवार खोकला होत होता. तात्पुरत्या औषधानं बर वाटायचं मात्र पुन्हा खोकला सुरू व्हायचा. पालकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानं मुलाचं सीटीस्कॅन निर्णय घेतला. त्यानंतर रिपोर्टमध्ये जे दिसलं ते पाहून डॉक्टरांची झोप उडाली. डॉक्टरांना सुरुवातीला असं वाटलं की त्याच्या फुफ्फुसात काहीतरी त्रास असल्यामुळे असं होत असावं. मात्र सीटीस्कॅननंतर आलेल्या अहवालातून मुलाच्या फुफ्फुसात बॉलपेनचं झाकण असल्याचं दिसलं. डॉक्टरांनी रिपोर्टपाहून पालकांना माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार या 12 वर्षांच्या चिमुकल्य़ानं नोव्हेंबर महिन्यात पेनाचं झाकण गिळल्याचं सांगितलं. मात्र त्यावेळी कोणताही त्रास झाला नव्हता. त्यानंतर काही दिवसांनी मात्र तो बेचैन असायचा आणि त्याला खोकला सुरू झाला. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर डॉक्टरांनी तातडीनं ऑपरेशन केलं आणि फुफ्फुसातून पेनाचं झाकण काढलं. सध्या या मुलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना पश्चिम बंगालमध्ये दक्षिण कोलकाता इथली असल्याची माहिती मिळत आहे. SSKM रुग्णालयातील ENT विभाग प्रमुख डॉ. अरुणाभ सेनगुप्ता यांनी मुलाच्या प्रकृतीविषयी सांगितले की, कोलकाताच्या गारिया भागात राहणारे सेठ सुखलाल कर्णानीला सतत खोकला आणि सर्दी झाल्याने रुग्णालयात दाखल केलं होतं. सीटीस्कॅननंतर त्याच्या फुफ्फुसात पेनाची कॅप असल्याचं समजलं. सुरुवातीला तिथल्या डॉक्टरांना यावर विश्वासच बसत नव्हता. थोडा अजून उशीर झाला असता तर मुलाच्या जीवावर बेतू शकलं असतं असं तिथल्या डॉक्टरांचं म्हणणं होतं. अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी पालकांनी त्यांच्या मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देणं आवश्यक आहे. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर त्रास होत नाही म्हणून डॉक्टरकडे जाणं टाळलं जातं हे त्याहून अधिक गंभीर आहे. अशा घटना मुलांच्या जीवावर बेतू शकतात त्याचं गांभीर्य पालकांनी वेळीच ओळखायला हवं असं आवाहनही यावेळी डॉक्टरांनी सगळ्या पालकांना केलं आहे. हेही वाचा-5 वर्षांपासून मुलीवरच बलात्कार करत होता बाप, सावत्र आईने असा शिकवला धडा हेही वाचा-त्रास देते म्हणून मुलानेच दिली आईची सुपारी, मारेकऱ्यांनी घरात घुसून केला गोळीबार
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या