कोल्हापूरकरांनो, मास्क वापराच नाहीतर..., प्रशासनाने घेतली आक्रमक भूमिका

कोल्हापूरकरांनो, मास्क वापराच नाहीतर..., प्रशासनाने घेतली आक्रमक भूमिका

'सर्वांनीच आता सतर्क राहून खबरदारी घेण्याची गरज आहे. समूह संसर्ग थांबविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे.'

  • Share this:

कोल्हापूर, 13 जुलै : 'गावा-गावात प्रबोधनावर भर देवून नियमावली समजवून सांगा, विनामास्क असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करा', असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. तर समूह संसर्ग थांबविण्यासाठी सर्वांनीच सतर्क राहून प्रयत्न करावे. ट्रेसिंग झाल्या झाल्या संबंधितावर उपचार सुरू करा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातून आज सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार,गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक अधिकारी यांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यात आला.

'रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट सुरू करा'

यावेळी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यावेळी म्हणाले, 'दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे. 15 ऑगस्टपर्यंत परिस्थिती अशी राहील. त्यासाठी सर्वांनी खबरदारी घेवून पूर्वतयारी असली पाहिजे. रॅपिड ॲन्टीजेन टेस्टला सुरूवात करावी. लक्षणे दिसल्यावर व्यक्तीला उपचारासाठी त्वरित दाखल करावे. नागरिकांनींही लक्षणे दिसल्यास स्वत:हून उपचारासाठी दाखल व्हावे', असे आवाहन त्यांनी केले.

विना मास्कबाबत कठोर कारवाई करा

'विशेषत: ग्रामीण भागात मास्क वापरण्यासाठी गावा-गावात प्रबोधन करावे. सामाजिक अंतर राखण्याबाबतही माहिती द्यावी. जे विनामास्क असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. रूग्णसंख्या वाढत असतील तर गावाने कडक लॉकडाउन करावे. एकही मृत्यू होणार नाही याची सर्वांनी सतर्क राहून काळजी घ्यावी', असेही ग्रामविकासमंत्री  मुश्रीफ म्हणाले.

पत्नीनं पतीला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं, गाडीच्या बोनेटवर चढून केला राडा

पालकमंत्री पाटील यावेळी म्हणाले, 'सर्वांनीच आता सतर्क राहून खबरदारी घेण्याची गरज आहे. समूह संसर्ग थांबविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे. लक्षणं दिसल्यावर उपचार सुरू झाला पाहिजे. त्यासाठी झालेल्या सर्वेक्षणाचा नियोजनासाठी वापर करा. सर्वेक्षण करणाऱ्या पथकांनी  अधिक काळजी घ्यावी. मृत्यू रोखण्यासाठी ट्रेसिंग झाल्याबरोबर उपचार सुरू करा. व्याधीग्रस्त नागरिकांवर अधिक लक्ष केंद्रित करा.'

'सर्वांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा ग्रामसमिती, प्रभागसमिती यांना सक्रीय झालं पाहिजे. माझ्या तालुक्यात, माझ्या गावात एकही मृत्यू होणार नाही याबाबत दक्ष रहा. इली, सारी या रूग्णांची माहिती मिळविण्यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्यासोबत बैठक घ्या. अशा रूग्णांना ताबडतोब उपचारासाठी पाठवावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकायचे नाही, सामाजिक अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे याबाबत गावामध्ये दवंडी देवून ग्रामस्थांचे प्रबोधन करावे. त्याबाबत त्यांना सवय लावा. त्यानंतरही जर कुणी या नियमांचा भंग करत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा', असे आदेशरही जिल्हाधिकारी देसाई यांनी दिले.

राजस्थानमधील सत्ता संघर्षावर संजय राऊतांचे सूचक विधान, म्हणाले...

त्याचबरोबर, 'नोकरी अथवा व्यवसायाच्या निमित्ताने नजिकच्या जिल्ह्यात विशेषत: सांगली जिल्ह्यात जाण्यासाठी दैनंदिन पास देण्यात आले आहेत. अशा पासधारकांनी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर त्याचबरोबर सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. परजिल्ह्यातून आपल्या घरी परतल्यानंतर आवश्यक ती खबरदारी घेणे त्यांना बंधनकारक आहे. विनाकारण, विनाकाळजी असे जर कुणी समुहामध्ये फिरत असेल, नियमांचा भंग करत असेल तर अशा पासधारकांचे दैनंदिन पास रद्द करावेत. विशेषत: शिरोळ, जयसिंगपूर या नगरपालिकांनी याबाबत सोमवारपासून कडक अंमलबजावणी करावी. यासाठी विशेष पथकं नेमून  पोलीस, गृहरक्षक दल यांची मदत घ्यावी' असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

Published by: sachin Salve
First published: July 13, 2020, 1:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading