शरद पवारांनी आवाहन केलं अन् अर्ध्यातासात 1 कोटी रुपयांची मदत जमा

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आवाहन केलं अन् अवघ्या अर्ध्यातासात एक कोटी रुपयांची मदत जमा झाली.

News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2019 09:22 PM IST

शरद पवारांनी आवाहन केलं अन् अर्ध्यातासात 1 कोटी रुपयांची मदत जमा

जितेंद्र जाधव, (प्रतिनिधी)

बारामती, 9 ऑगस्ट- कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आवाहन केलं अन् अवघ्या अर्ध्यातासात एक कोटी रुपयांची मदत जमा झाली. शरद पवार यांनी रयत भवनमध्ये शु्क्रवारी बारामती शहरातील व्यापाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. पूरग्रस्तांच्या मदतनीधीसाठी त्यांनी व्यापाऱ्यांना मदतीचं आवाहन केलं. या आवाहानाला प्रतिसाद देत व्यापारी आणि पदाधिकाऱ्यांनी भरभरून मदत केली. अवघ्या अर्ध्यातासात एक कोटी रुपयांचा निधी जमा झाला.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्या प्रतिष्ठानकडून 25 लाख रुपयांची मदत देण्यात आली. याशिवाय माजी नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी पाच लाखांची मदत दिली. त्यानंतर बारामतीतल्या व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांसह धान्य, कपडे आणि भांड्यांची मदत देण्यात आली. याशिवाय सहकारी साखर कारखान्यांनी 400 पोती साखर देण्याचे जाहीर केले.

शरद पवार उद्या पूरग्रस्त भागात

शरद पवार उद्या, शनिवारी पूरग्रस्त सांगली, सातारा भागाचा दौरा करणार आहे. या दौर्‍यात ते पूरग्रस्त भागांना भेटी देऊन तेथील नागरिकांनाही भेटणार आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे ही त्यांच्या समवेत असणार आहेत. सकाळी 09 वाजता ते तांबावणे (ता.फलटण, जि.सातारा) येथील पूरग्रस्त भागाची पाहाणी व नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 03 वाजता पलुस (ता.जि.सांगली) येथील पूरग्रस्त भागाची पाहाणी व नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना दिलासा देणार आहेत. सायंकाळी 05 वाजता ते सांगली येथील पूरग्रस्त व कॅम्पला ही भेट देणार आहेत.

Loading...

मृत्यूच्या दाढेत 'तो' 3 दिवस तराफ्यावर होता बसून, पाहा हा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2019 09:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...