Home /News /news /

FACT CHECK: कोल्हापूरच्या रुग्णाचा खरंच कोरोनामुळे झाला मृत्यू, वाचा काय आहे सत्य

FACT CHECK: कोल्हापूरच्या रुग्णाचा खरंच कोरोनामुळे झाला मृत्यू, वाचा काय आहे सत्य

कोरोनामुळे या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं प्रमाण आणखी वाढलं होतं. पण यामगचं सत्य आता समोर आलं आहे.

कोल्हापूर, 16 मार्च: कोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयिताचा मृत्यू झाला होता. संबधित व्यक्ती 15 तारखेला कोरोना संशयित म्हणून सीपीआरमध्ये दाखल झाली होती. सर्व चाचण्या झाल्यानंतर रिपोर्ट येण्याआधीच रुग्णाचा मृत्यू झाला होता. कोरोनामुळे या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं प्रमाण आणखी वाढलं होतं. पण यामगचं सत्य आता समोर आलं आहे. या रुग्णाचा मृत्यू नेमकाा कशामुळे झाला याची माहिती डॉक्टरांनी माध्यमांना दिली आहे. विरेंद्रसिंह यादव असं मृत्यू झालेल्या रुग्णाचं नाव आहे. विरेंद्रसिंह यादव (वय 68, रा. नागाव फाटा) यांचा मृत्यू जुन्या फुफूसाच्या विकारामुळे झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी यांनी आज दिली. त्यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटलं आहे की, 'मृत यादव हे रविवार दिनांक 15 मार्चरोजी पहाटे 4 वा. श्वसनाचा त्रास असल्यामुळे गंभीर अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल झाले होते. 8 मार्च ते 12 मार्च या कालावधित हरियाणा, दिल्ली, पुणे, कोल्हापूर असा प्रवास केला होता. या रुग्णास पूर्वीपासून असलेल्या जुन्या फुफुसाच्या आजाराचा कोल्हापुरात आल्यानंतर जास्त त्रास जाणवू लागल्यानं खासगी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर सीपीआरमध्ये दाखल झाले होते.' ते पुढे म्हणाले की, 'या रुग्णाचा प्रवास हा हरियाणा, दिल्ली, पुणे, कोल्हापूर अशा ठिकाणचा असल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या स्वॅबचे नमुने घेवून पुणे इथल्या एन आय व्ही संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सीपीआरमध्ये व्हेंटीलेटरच्या सहाय्याने उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान रविवारी 15 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता त्यांचा मृत्यू झाला.' हे वाचा - दिल्ली निर्भया प्रकरण: नराधमांच्या नातेवाईकांनी राष्ट्रपतींकडे मागितलं इच्छामरण! मृत विरेंद्रसिंह यादव हे कोरोना संशयित रुग्ण या व्याखेत बसत नसल्यामुळे त्यांच्या स्वॅब नमुन्याची तपासणी करण्याची आवश्यकता नाही, असं पुण्यातील एन आय व्ही संस्थेनं कळवलं आहे. त्यामुळे तो संशयित कोरोना रुग्ण नाही. त्यांचा मृत्यू जुन्या फुफुसाच्या विकारामुळे झाला आहे. हे स्पष्ट होतं.' सावधान मुंबई! कोरोनाचे आणखी 4 रुग्ण पॉझिटिव्ह, राज्यातील रुग्णांची संख्या 38 वर राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखीन 4 रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती मिळत आहे. आता राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 37वर गेली आहे. मुंबईमध्ये तीन आणि नवी मुंबईत एक रुग्ण आढल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्ग लक्षात घेता शाळा, महाविद्यालयं, चित्रपट गृह बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यापाठोबात आता मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असल्यानं मुंबईकरांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. हे वाचा - धक्कादायक! न्यायालयाच्या शौचालयात आढळला लिपिकाचा मृतदेह, हत्या की आत्महत्या? पुणे - 16 नागपूर - 4 यवतमाळ - 2 ठाणे - 1 अहमदनगर - 1 कल्याण 1 पनवेल - 1 नवी मुंबई - 1 मुंबई - 8 नवी मुंबई- 1 औरंगाबाद - 1 महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पुण्यात आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर हा व्हायरस वेगाने पसरू शकतो. शहरात या व्हायरस अजून पसरू नये, म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भागांमध्ये जमावबंदी लागू होऊ शकते. कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात राज्यातल्या सरकारी आणि खासगी सर्व शाळांचा समावेश आहे. येत्या 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. हे वाचा - एकमेकांच्या जीवावर उठले सख्खे भाऊ, असे भांडले की एकाचवेळी दोघांचा पडला मृतदेह
Published by:sachin Salve
First published:

Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus disease, Coronavirus symptoms

पुढील बातम्या