कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सवास प्रारंभ

कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सवास प्रारंभ

करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात आज पासून किरणोत्सवाच्या सोहळ्याला सुरुवात झालीय. त्यामुळे कोल्हापूरमध्ये राज्यभरातून भाविक दाखल झाले असून आज किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्य किरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श केला आणि ही किरणे मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत गेली

  • Share this:

कोल्हापूर, 09 नोव्हेंबर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात आज पासून किरणोत्सवाच्या सोहळ्याला सुरुवात झालीय. त्यामुळे कोल्हापूरमध्ये राज्यभरातून भाविक दाखल झाले असून आज किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्य किरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श केला आणि ही किरणे मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत गेली... त्यामुळे आज पहिल्याच दिवशी भाविकांना हा सुवर्ण क्षण अनुभवता आला.

वर्षांतून दोन वेळा अंबामातेच्या या मंदिरामध्ये किरणोत्सव पार पडतो. स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून अंबाबाईच्या मंदिराला ओळखला जात..पुढचे दोन दिवस अजून हा किरणोत्सव चालणार असून अंबामातेच्या भक्तांसाठी ही एक पर्वणीच असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2017 07:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading