कोल्हापूर : भूमाता ब्रिगेडच्या उपाध्यक्ष माधुरी शिंदेंची पतीने केली निर्घृण हत्या

कोल्हापूर : भूमाता ब्रिगेडच्या उपाध्यक्ष माधुरी शिंदेंची पतीने केली निर्घृण हत्या

शिरोळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या अशी माधुरी शिंदे यांची ओळख होती.

  • Share this:

कोल्हापूर,23 जून : भूमाता बिग्रेडच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षा माधुरी शिंदे यांची त्यांच्या पतीनंच हत्या केल्यानं एकच खळबळ उडालीय. या प्रकरणी पती सूर्यकांत शिंदेला अटक करण्यात आलीये.

पुण्यात प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या, धडापासून शीर केलं वेगळं

सूर्यकांत शिंदेनं कुहाऱ्डीचे वार करून माधुरी शिंदे यांचा खून केला. चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. याप्रकरणी मुलीने फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी सूर्यकांत शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे.

शिरोळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या अशी माधुरी शिंदे यांची ओळख होती. तसंच भूमाता बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या संघटनेच्या त्या कोल्हापूर जिल्ह्याच्या उपाध्यक्षा होत्या.

तसंच शिरोळ तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या छत्रपती गृपच्याही त्या उपाध्यक्षा होत्या. या संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी शिरोळ विधानसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती.

कोण आहे माधुरी शिंदे ?

छत्रपती ग्रुपच्या उपाध्यक्षा

शिरोळ तालुक्यात सामाजिक कार्यकर्त्यां म्हणून ओळख

तृप्ती देसाईंच्या आंदोलनात सहभाग

First published: June 23, 2018, 11:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading