'आमचं ठरलंय मटण नदीपलीकडं', कोल्हापुरात का लागले बॅनर्स!

'आमचं ठरलंय मटण नदीपलीकडं', कोल्हापुरात का लागले बॅनर्स!

तांबडा पांढरा रस्सा आणि लाल भडक चटणीसाठी इथं आलेले सगळेच पेटून उठले आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 19 नोव्हेंबर : कोल्हापुरात आलेला पर्यटक कोल्हापुरी मटणावर ताव मारतोच मारतो. पण, आता याच मटणाच्या दरावरून वादंग निर्माण झाला आहे.

ठसकेबाज तांबडा पांढरा रस्सा आणि झणझणीत मटण ही कोल्हापूरची खासियत. मात्र, हेच मटण आता महाग झालंय. त्यामुळे हॉटेलमालकांनी बैठक बोलावण्यात आली. तांबडा पांढरा रस्सा आणि लाल भडक चटणीसाठी इथं आलेले सगळेच पेटून उठले आहे. शहराचा भाग असलेल्या कसबा बावडामध्ये मटणाच्या दरावरून एक वादंग निर्माण झालंय.

खाटिकांनी मटणाचा दर सहाशे रुपये प्रति किलो केला. ही दरवाढ झाल्यानं खवय्ये खवळले आहेत. दरवाढीच्या विरोधात बैठक घेऊन, काही खेडेगावात मटणाचा दर चारशे रुपये प्रति किलो आहे, तोच दर इथं लागू करण्याची मागणी करण्यात आली.

कोल्हापुरातल्या मटणाची चव आता सगळ्यांच्याच परिचयाची झालीय. ही चव कायम राहावी यासाठी दर कमी कमी करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे या मुद्यावर विक्रेत्यांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना भेटलो.

कर्नाटक किंवा पुणे मुंबईतले व्यापारी बकऱ्यांची खरेदी चढ्या दराने करतात. परिणामी मटणाचा दर कमी करता येत नाही असं खाटिक समाजानं स्पष्ट केलं.

मटणाच्या दरावरून आता वेगवेगळे फलकही अनेक भागांमध्ये पाहायला मिळत आहेत. आमचं ठरलंय मटण नदीपलीकडून हा फलक चर्चेचा विषय झाला आहे.

===============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: kolhapur
First Published: Nov 19, 2019 07:29 AM IST

ताज्या बातम्या