कोल्हापुरात राष्ट्रवादीचा महापौर, भाजपचा केला पराभव

कोल्हापुरात राष्ट्रवादीचा महापौर, भाजपचा केला पराभव

खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी महापौरपदाचं आरक्षण होतं. महापौरपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सरिता मोरे व उपमहापौरपदासाठी भूपाल शेटे, तर भाजप-ताराराणी आघाडीकडून जयश्री जाधव व उपमहापौरपदासाठी कमलाकर भोपळे रिंगणात होते.

  • Share this:

कोल्हापूर, 10 डिसेंबर : कोल्हापूर महापालिकेच्या 47 व्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या सरिता मोरे यांची निवड झाली आहे. सरिता मोरे यांनी भाजपच्या जयश्री जाधव यांचा केला 41 विरुद्ध 33 असा पराभव केला आहे. मतदानापूर्वी राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेसचा एक सदस्य अपात्र ठरवूनही आघाडीने सत्ता राखली.

कोल्हापूर महापालिकेत आज महापौर पदासाठी निवडणूक झाली आहे. यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या परिसरात पोलिसांनी छावण्या उभ्या करण्यात आल्या होत्या.

शिवसेना तटस्थ

शिवसेनेचे चार नगरसेवक मतदान करण्याऐवजी तटस्थ राहिले आहेत. परिणामी, निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पीठासन अधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. महापालिका प्रशासनाच्या वतीने निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली होती.

महापौरपदासाठीचं आरक्षण, कोण होते उमेदवार?

खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी महापौरपदाचं आरक्षण होतं. महापौरपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सरिता मोरे व उपमहापौरपदासाठी भूपाल शेटे, तर भाजप-ताराराणी आघाडीकडून जयश्री जाधव व उपमहापौरपदासाठी कमलाकर भोपळे रिंगणात होते.

5 नगरसेवक अपात्र

जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत न दिल्याने पाच नगरसेवक अपात्र ठरले आहेत.

VIDEO : कांद्याला 1 रुपया भाव , संतापलेल्या शेतकऱ्याने फुकट वाटले कांदे

First published: December 10, 2018, 11:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading