मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राज्यात आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण, काँग्रेसमध्ये खळबळ

राज्यात आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण, काँग्रेसमध्ये खळबळ

राफेल विमानबाबत काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसमे ट्विट करीत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की – राफेलच्या आगमनावर वायूसेनेला शुभेच्छा देत तुम्ही भाजप सरकारच्या गोंधळावर प्रश्न उपस्थित करत असाल तर समजा अजूनही तुमच्यात देशभक्ती जिवंत आहे..जय हिंद

राफेल विमानबाबत काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसमे ट्विट करीत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की – राफेलच्या आगमनावर वायूसेनेला शुभेच्छा देत तुम्ही भाजप सरकारच्या गोंधळावर प्रश्न उपस्थित करत असाल तर समजा अजूनही तुमच्यात देशभक्ती जिवंत आहे..जय हिंद

राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त वारंवार समोर येत आहे.

कोल्हापूर, 21 ऑगस्ट : राज्यात कोरोनाच्या संकटाचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशात अद्यापही रुग्णसंख्येवर नियंत्रण आणणं शक्य झालेलं नाही. त्यात राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त वारंवार समोर येत आहे. आताही आणखी एका काँग्रेस आमदाराला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापूर इथले काँग्रेस आमदार रूतुराज पाटील यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह येताच त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर इथेच उपचारासाठी दाखल करण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे. तर पाटील यांच्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घ्यावी, लक्षणं असल्यास तात्काळ टेस्ट करून घ्यावी असं आवाहन आमदार रूतुराज पाटील यांनी केलं आहे. मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू, राज्यासाठी हवामान खात्याकडून इशारा खरंतर, राज्यात अनेक राजकीय मंत्र्यांच्या घरी कोरोनाचा शिरकाव झाला आहे. गेल्या काही दिवसांआधीच काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार मोहनराव कदम हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली होती. मोहनराव कदम यांची रॅपिड कोरोना चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. नेटवर्क नाही म्हणून गावापासून दूर जंगलात येऊन केला ऑनलाइन क्लास मोहनराव कदम हे माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांचे भाऊ आहेत. सांगलीमध्ये कोरोनाच्या संकटात काम करत असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. कदम यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर मोहनराव यांच्या कुटुंबियाचीही कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. कदम यांच्या संपर्कात कोण-कोण आलं होतं यासाठी तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
First published:

Tags: Corona, Coronavirus, Lockdown

पुढील बातम्या