• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा धक्का, या दोन जागांवर महाविकास आघाडीचा उदो उदो

कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा धक्का, या दोन जागांवर महाविकास आघाडीचा उदो उदो

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता ग्रामीण भागातही भाजपला मोठा धक्का बसला आहे असं म्हणायला हरकत नाही.

  • Share this:
कोल्हापूर, 30 डिसेंबर : एकीकडे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सुरू असतानाच तिकडे कोल्हापूरमध्ये चंदगड नगरपंचायतीवर महाआघाडीची सत्ता आली आहे. तर हातकणंगलेमध्येही शिवसेना अव्वल ठरली आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता ग्रामीण भागातही भाजपला मोठा धक्का बसला आहे असं म्हणायला हरकत नाही. विधानसभेत बहुमताचा सगळ्यात मोठा आकडा गाठला असतानाही भाजपला  विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली तर सध्या भाजपमध्ये अंतर्गत वादही सुरू आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सुरू असताना दुसरीकडे कोल्हापुरात मोठा जल्लोष सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड आणि हातकणंगले नगरपंचायतीच्या निकालाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चंदगड हे महाराष्ट्राचे शेवटचे टोक दुर्गम भाग म्हणून ओळखल जातं. अनेक वर्षांपासून इथे ग्रामपंचायत होती. मात्र, नगरपंचायतीची स्थापना झाल्यावर पहिल्यांदा पंचवार्षिक निवडणूक लागली आणि मोठ्या चुरशीने रविवारी मतदान झालं. सोमवारी या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये प्राची कानेकर या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. त्यांच्या विरोधातल्या समृद्धी कानेकर या भाजपच्या उमेदवार होत्या त्या पराभूत झाल्या आहेत. चंदगडमध्ये महाआघाडीने 10 जागा पटकावल्या तर भाजपला 5 जागांवर समाधान मानावे लागलं. दोन अपक्ष उमेदवारही तिथं निवडून आलेत. इतर बातम्या - देशाचे पहिले CDS होणार लष्करप्रमुख बिपिन रावत, सांभाळणार तिन्ही सैन्याची कमान तिकडे हातकणंगलेमध्येही 17 जागांसाठी मोठ्या चुरशीने मतदान झालं होतं. हातकणंगलेमध्ये शिवसेनेला सर्वाधिक म्हणजेच सात जागा मिळवता आल्या आहेत. पण तिथे काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. काँग्रेस पक्षाचे अरुण जानवेकर हे नगराध्यक्षपदी निवडून आलेत. शिवसेनेने 7, भाजपने 5 काँग्रेस राष्ट्रवादीने प्रत्येकी एक जागा मिळवल्या आहेत तर तीन अपक्ष नगरसेवकही निवडून आलेत. हातकणंगलेमध्ये दोन्ही काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र होती. मात्र, शिवसेना आणि भाजपने वेगवेगळी निवडणूक लढवली होती. खरंतर, कोल्हापूर जिल्ह्यात गटातटाचे राजकारण चालतं. पक्षापेक्षा व्यक्ती श्रेष्ठ ही देखील कोल्हापूरची ओळख आहे. परिणामी आज अनेक नगरसेवकांच्या अंगावर गुलाल पडला तो नव्या राजकीय फॉर्मुल्यामुळेच. त्यामुळे विधानसभेच्या पराभवानंतर आता ग्रामीण भागातही होणाऱ्या पराजयाचं भाजपला आत्मपरिक्षण करणं महत्त्वाचं असल्याची चर्चा सुरू आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published: