कोल्हापूर बस दुर्घटना : पोलीस अपघाताचा डेमो करून पाहणार ?

कोल्हापूर बस दुर्घटना : पोलीस अपघाताचा डेमो करून पाहणार ?

'"या प्रकरणी मिनी ट्रॅव्हलमध्ये कोणताही दोष नव्हता अशी माहिती पुढे आलीये"

  • Share this:

29 जानेवारी : कोल्हापूरमध्ये मिनी ट्रॅव्हलच्या अपघातात १३ जणांचा बळी गेला होता. आता या प्रकरणी मिनी ट्रॅव्हलमध्ये कोणताही दोष नव्हता अशी माहिती पुढे आलीये. तसंच या अपघाताचा पोलीस डेमो करून पाहणार असल्याची माहिती मिळालीये.

कोल्हापुरात शिवाजी पुलावरून मिनी बस पंचगंगा नदीत कोसळली होती. मिनी बस नदीत कोसळली कशी याबद्दल पोलीस सर्वबाजूने तपास करत आहे. अपघाताच्या वेळी गाडीचे एक्सल आणि टायर सुस्थितीत होते, अशी माहिती पोलीस आणि आरटीओ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला दिलीये.

अपघाताच्या वेळी गाडी 90 अंशात का वळाली याचा तपास सुरू आहे. चालकाचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाला पण चालकानं मद्यपान केलं नव्हता अशी माहितीही सूत्रांनी दिली.

दरम्यान, गाडीचा मालक अमोल हगवणेला पुण्यातून पोलीस ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे. तसंच कोल्हापूर पोलीस अपघाताचा डेमो करून पडताळणी करणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

First published: January 29, 2018, 7:24 PM IST

ताज्या बातम्या