देव तारी..!,तब्बल 30 फुटावरुन कार नदीत कोसळली, सर्व सुखरूप

देव तारी..!,तब्बल 30 फुटावरुन कार नदीत कोसळली, सर्व सुखरूप

चिकोत्रा नदीच्या पुलावरून तब्बल तीस फूट खाली नदीत एक कार कोसळून अपघात झालाय पण नशीब बलवत्तर म्हणून यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही

  • Share this:

कोल्हापूर, 18 जून : "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीची प्रत्यय आज कोल्हापुरात पाहण्यास मिळाला.  चिकोत्रा नदीच्या पुलावरून तब्बल तीस फूट खाली नदीत एक कार कोसळून अपघात झालाय पण नशीब बलवत्तर म्हणून यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही, कुठलीही जीवितहानी झालेली नाहीय.

 VIDEO: मालाड स्टेशनवर धावत्या लोकलखाली तरुणाची आत्महत्या,सीसीटीव्हीत कैद

कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातील पिंपळगावजवळ ही घटना घडली आहे. इथल्या चिकोत्रा नदीच्या पुलावरून कोल्हापूर मधील एक कापड व्यापारी त्यांच्या दोन मित्रांसोबत या पुलावरून जात असताना त्यांचा कार वरचा ताबा सुटला आणि गाडी थेट पुलावरून तीस फूट खोल खाली नदीत कोसळली, पण स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना त्वरित गाडीतून बाहेर काढण्यात आलं त्यामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही मात्र या अपघातात गाडीचा चक्काचूर झालाय.

फक्त 20 रूपयांसाठी रिक्षाचालकाने घेतला प्रवाशाचा जीव

कोण भरवतं उदयनराजे भोसलेंच्या मनात धडकी?

 

First published: June 18, 2018, 5:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading