• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • Dressing in Interview: मुलाखतीसाठी तयार होताना या महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात; जॉब तुम्हालाच मिळणार

Dressing in Interview: मुलाखतीसाठी तयार होताना या महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात; जॉब तुम्हालाच मिळणार

आज आम्ही तुम्हाला Interview ला जाताना तुमचा ड्रेसिंग कसा असावा याबद्दल माहिती देणार आहोत.

  • Share this:
    मुंबई, 29 जून : Interview ला जाताना आपल्या डोक्यात कशाचा अभ्यास करून जाणार, काय बोलणार, कसं वागणार अशा बऱ्याच गोष्टी असतात. मात्र या सर्व गोष्टींमध्ये आपण आपल्या कपड्यांवर किंवा ड्रेसिंगवर (Dressing sense) लक्ष देत नाही. अनेकदा आपण एखाद्या जॉबसाठी (dressing in Job) पात्र असतो मात्र केवळ आपल्या कपडे घालण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे आपल्याला तो जॉब (Job Interview) मिळू शकत नाही. मात्र यानंतरच्या Interview ला जाताना जर तुमचे कपडे नीटनेटके राहिले तर जॉब तुम्हालाच मिळेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला  Interview ला जाताना तुमचा ड्रेसिंग  कसा असावा याबद्दल माहिती देणार आहोत. कपड्यांचा रंग ठरवा ऑनलाइन Interview साठी साधे कपडे निवडा. बर्‍याच प्रिंट्स आणि नमुन्यांसह कपडे घालू नका. जर तुमच्या खोलीचा रंग गडद असेल तर फिकट रंगाचे (Faint colors) कपडे घाला, जर तुमची खोली रंगत असेल तर गडद रंगाचे कपडे घाला. सैल कपडे घालू नका Interview दरम्यान घातलेल्या आउटफिट्सची नेकलाइन खूप खाली आणि सैल असू नये. त्याऐवजी तुम्ही हाय- नेक, राउंड नेक किंवा कॅालर नेक शर्ट किंवा टीशर्टचा वापर करू शकता. हे वाचा - General Knowledge: स्पर्धा परीक्षांसाठी आणि नोकरीसाठी अशी करा 'GK' ची तयारी प्रोफेशनल दिसा Interview दरम्यान तुम्ही ब्लेझर देखील घालू शकता. ब्लेझरमुळे प्रोफेशनल दिसण्यास मदत होईल. मात्र खूप उकाडा जाणवत्र असेल तर ब्लेझर वापरू नका. दागिने घालू नका आपण वेस्टर्न किंवा भारतीय परिधान केलेले असो मात्र त्यावर जास्त असेसरीज घालू नका. दागदागिने घालू नका. यामुळे तुमच्या हातातून जॉब जाऊ शकतो.
    Published by:Atharva Mahankal
    First published: