Home /News /news /

Vidarbha Weather : विदर्भातील तापमान दिवसेंदिवस वाढतंय; वाचा, 'ही' आहेत त्यामागची कारणे

Vidarbha Weather : विदर्भातील तापमान दिवसेंदिवस वाढतंय; वाचा, 'ही' आहेत त्यामागची कारणे

title=

विदर्भातील चंद्रपुरात मार्च महिन्याच्या शेवटी विदर्भातील चंद्रपूर (Hottest City Chandrapur) शहराचा जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये समावेश झाला होता. तेथील तापमानाचा पारा हा तब्बल 43.4 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता.

  नागपूर, 21 मे : मार्च महिन्यापासून राज्यातील तापमानाने उच्चांक गाठला (Temperature in Maharashtra) होता. परिणामी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. (Heat wave in Maharashtra) उष्णतेचा हा वाढता पारा अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रातील विदर्भातही तापमानाची हीच परिस्थिती आहे. उन्हामुळे जनता अक्षरश: त्रस्त झाली आहे. विदर्भातील चंद्रपुरात मार्च महिन्याच्या शेवटी विदर्भातील चंद्रपूर (Hottest City Chandrapur) शहराचा जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये समावेश झाला होता. तेथील तापमानाचा पारा हा तब्बल 43.4 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. अशा परिस्थितीत दिवसेंदिवस विदर्भातील वाढत असणारे तापमान ही एक चिंतेची बाब आहे. मग या तापमान वाढीमागची नेमकी कारणे काय आहे?, हे आज आपण जाणून घेणार आहोत. पावसाचा कहर; वीज पडून 33 जणांचा मृत्यू, PM मोदींकडून शोक व्यक्त तापमान वाढीची कारणे - 
  1. उत्तर भारतातून विरुद्ध दिशेने वाहणारे हे वारे राजस्थानकडून वाहताना उष्म व कोरडे असतात. विशेषत: हे वारे गरम स्वरूपाचे असल्याने हे विदर्भाकडे वळताना त्यांचे तापमान वाढते. त्यामुळे तापमानात वाढ होत असते.
  2. विदर्भात सूर्य किरणांचा प्रभाव हा मोठ्या होत असतो. याचे कारण असे की, विदर्भ हा कर्कवृत्तापासून जवळच आहे. यामुळे सूर्यकिरणे ही थेट येत येतात. म्हणून तापमानात वाढत होत जाते.
  3. विदर्भ हा प्रदेश जास्तीत जास्त सपाट भूपृष्ठावर आहे. या ठिकाणी डोंगराळ भाग कमी आहेत. याच कारणामुळे विदर्भातील मृदा हीदेखील लवकर गरम होत असते. यामुळे परिणामी तापमानात वाढ होते.
  4. काही जिल्हे जसे चंद्रपूर व नागपूर या शहरांमध्ये औद्योगिक वसाहती, औष्णिक विद्युत प्रकल्प, लहान मोठे कारखाने आणि खनिज कर्म ते मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे वातावरणात बदल होतो. तसेच घातक वायूही पसरतात. याचमुळे इतर ठिकाणांपेक्षा या दोन जिल्ह्यातील तापमान हे 1 ते 2 अंश सेल्सिअसने हे वाढलेले दिसते. या सर्व कारणांमुळे विदर्भातील तापमान हे दिवसेंदिवस वाढत आहे.
  First published:

  Tags: Maharashtra News, Rise in temperatures, Vidharbha

  पुढील बातम्या