मुंबई, 13 जुलै: कोरोनामुळे (Corona) अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे नाईलाजानं अशा लोकांना स्वतःचा व्यवसाय (Business) सुरु करावा लागला आहे. तर काही लोक आहेत ज्यांना स्वतःहून नोकरी सोडून व्यवसाय सुरु करायची इच्छा आहे. मात्र व्यवसाय सुरु करणं हे सोपी काम नाही. कोणताही व्यवसाय सुरु करायचं म्हंटलं की अनेक गोष्टी असाव्या लागतात. जर व्यवसायात यश (Success in Business) मिळवायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडवल (Money) आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा Smartness. व्यवसायात यश मिळवायचं असेल तुम्ही एक 'smart Businessman' असायला पाहिजे. पण तुमच्या अंगी पुढील काही गुण असतील तरच तुम्ही 'Smart Businessman' होऊ शकता. कसं ते वाचा.
आपल्या प्रोडक्टची मार्केट व्हॅल्यू बघणं
जर तुम्हाला एखादा व्यवसाय सुरु करायचा आहेतर तुम्हाला त्या व्यवसायाची किंवा तुम्ही विकत असलेल्या प्रोडक्टची मार्केट व्हॅल्यू (Market Value) माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही विकत असलेली गोष्ट बाहेर कितीला विकली जातेय किंवा बाहेरच्या बाजारात उपलब्ध आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला हे माहिती असेल तरच तुम्ही 'smart Businessman' होऊ शकता.
सपोर्ट ग्रुप तयार करा
आता व्यवसाय म्हंटलं के सर्वात महत्त्वाची गोष्ट पैसे. व्यवसाय सुरु करताना अनेक गोष्टींमध्ये लाखो रुपये लागतात. नोकरी करणाऱ्या लोकांकडे इतके पैसे नसतात. अशावेळी घाबरून जाऊ नका. आपले मित्र, नातेवाईक किंवा कुटुंबीय यांच्या मदतीनं व्यवसाय सुरु करा. या लोकांना आपला सपोर्ट ग्रुप (Support Group) म्हणून सामील करून घ्या. अडचणीच्या वेळेला हे लोक नेहमी मदत करतील.
हे वाचा - 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी; सांगली डाक विभागात पदभरती
मार्केट रिसर्च महत्त्वाची
लक्षात ठेवा. व्यवसाय सुरु करणारे तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या आधीही तुमच्यासारखेच असे अनेक व्यवसाय सुरु झाले आहेत. हे तुमचे प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे मार्केट रिसर्च (Market Research) करायला विसरू नका. त्यांनी ज्या चुका केल्यात त्या तुमच्याकडून होणार नाहीत याची काळजी घ्या.
आपले कॉन्टॅक्टस वाढवा
'Smart Businessman' व्हायचं असेल तर सर्वात आधी तुमच्या व्यवसायाशी निगडित ग्राहकांशी आणि डीलर्सशी संबंध वाढवणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला यश मिळू शकेल. तसंच ग्राहकांशी उत्तम व्यवहार करणं, त्यांना उत्तम प्रोडक्ट देणं, तसंच फसवणूक न करणं महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, Career, Success