राष्ट्रपती पदक मिळवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या घरी सापडले 9 कोटी

राष्ट्रपती पदक मिळवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या घरी सापडले 9 कोटी

कमलनाथ यांचे ओएसडी असलेले प्रविण कक्कड यांच्या घरी आयकर विभागानं छाप मारला.

  • Share this:

भोपाळ, 07 एप्रिल : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सचिव प्रविण कक्कड यांच्या घरावर आयकर विभागानं छापा मारला. इंदूरमधील घरावर ही कारवाई करण्यात आली. काँग्रेसच्या अत्यंत जवळचे असलेले प्रविण कक्कड यांनी आपला सर्वाधिक काळ हा पोलीस सेवेत घालवला आहे. राष्ट्रपती पदकानं देखील त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. पण, आयकर विभागानं मारलेल्या छाप्यामुळं आता प्रविण कक्कड चर्चेत आले आहेत.

जीवाजी विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयामध्ये प्रविण कक्कड यांना गोल्ड मेडल मिळालं आहे. काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी कार्य देखील केलं आहे.

प्रविण कक्कड काँग्रेस नेत्यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. 2004 ते 2011 या काळात त्यांनी कांतिलाल भूरिया यांचे ओएसडी म्हणून कम केलं आहे. शिवाय, कृषी आणि आदिवासी मंत्रालयामध्ये काम करण्याचा देखील त्यांना अनुभव आहे.

2011मध्ये कांतिलाल भूरिया मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर प्रविण कक्कड यांनी निवडणुकांची जबाबदरी अंत्यत जबाबदारीनं पार पाडली. त्यांच्या सल्ल्यानंतर काँग्रेसनं 2015मध्ये झाबुआ लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला. मोदी लाटेत त्यांनी ही कामगिरी केली होती.

कालानंतर कमलनाथ आणि प्रविण कक्कड यांची ओळख वाढली आणि कक्कड यांच्यावर सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. 2018मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. यावेळी त्यांनी वॉर रूमच्या प्रभारीपदाची जबाबदारी पार पाडली.


घरावर छापा

माजी पोलिस अधिकारी आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांचे खासगी सचिव प्रवीण कक्कड यांच्या घरावर एकाच वेळी वेगवेगळ्या पथकाने छापा टाकल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कक्कड यांच्या विजय नगर येथील घरावर छापा टाकण्यात आला. त्याच वेळेस कक्कड यांच्या नवी दिल्ली आणि मध्य प्रदेशमधील 15 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत.


VIDEO: मध्य प्रदेशमध्ये खळबळ, मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या घरावर आयकर विभागाचा छापा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2019 11:01 AM IST

ताज्या बातम्या