मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /बाप रे बाप! हॉटेल्स, जिम आणि टेक कंपनीचा मालक आहे रोनाल्डो, वर्षाची कमाई वाचून व्हाल थक्क

बाप रे बाप! हॉटेल्स, जिम आणि टेक कंपनीचा मालक आहे रोनाल्डो, वर्षाची कमाई वाचून व्हाल थक्क

रोनाल्डोचा खेळातील प्रवास तुम्हाला माहितच असेल मात्र त्याच्या बिझनेसबद्दल फार लोकांना माहिती नाही.

रोनाल्डोचा खेळातील प्रवास तुम्हाला माहितच असेल मात्र त्याच्या बिझनेसबद्दल फार लोकांना माहिती नाही.

रोनाल्डोचा खेळातील प्रवास तुम्हाला माहितच असेल मात्र त्याच्या बिझनेसबद्दल फार लोकांना माहिती नाही.

    पोर्तुगलचा (Portugal) स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे (Cristiano Ronaldo) जगभरात असंख्य चाहते आहेत. मैदानात त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. सोशल मीडियावरही (social media) रोनाल्डोचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या फॅन फॉलोअर्सची (fan followers ) संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रोनाल्डोचा खेळातील प्रवास तुम्हाला माहितच असेल मात्र त्याच्या बिझनेसबद्दल फार लोकांना माहिती नाही. रोनाल्डो फुटबॉलशिवाय (football) सोशल मीडियावरून देखील पैसे कमवतो. एवढंच नव्हे तर रोनाल्डोची अनेक हॉटेल्स (hotels), जिम (gym) असून त्याची एक टेक कंपनीदेखील (tech company) आहे. याबाबत जनसत्ताने वृत्त दिलंय.

    रोनाल्डो हा जगभरातील एकमेव खेळाडू आहे, ज्याचे इन्स्टाग्रामवर (Instagram) 303 मिलियन म्हणजेच तब्बल 30 कोटी 3 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर आहेत. फोर्ब्समधील माहितीनुसार, रोनाल्डो इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट टाकण्याचे 1 मिलियन डॉलर म्हणजेच जवळजवळ साडेसात कोटी रुपये घेतो. रोनाल्डो एका वर्षात केवळ इन्स्टाग्रामवरूनच 47.8 मिलियन म्हणजे 340 कोटी रुपये कमवतो. याशिवाय रोनाल्डो जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी (Richest Sportsperson in world) एक आहे.

    हे वाचा - नाकातोंडाने टाइपिंगचा विक्रम! कुणीच मोडू शकला नाही या भारतीयाचा वर्ल्ड रेकॉर्ड

    रोनाल्डोचे वार्षिक उत्पन्न 460 मिलियन म्हणजे 3400 कोटी रुपये आहे. रोनाल्डो अनेक टॉप ब्रँड्सच्या जहिराती करतो. त्यामध्ये हर्बालाईफ न्यूट्रिशन (Herbal life Nutrition) , क्लिअर हेअर केअर ब्रांड, अमेरिकन टुरिस्टर, पँजर ग्लासेस, इम्पोरिओ अरमानी, स्पोर्ट्स लॉब्स्टर, अॅमिरेट्स एअरलाईन यांचा समावेश आहे. माध्यमातील वृत्तांनुसार, या जाहीरातींच्या एका दिवसाच्या शुटिंगचे रोनाल्डो 8 ते 10 कोटी रुपये घेतो. तर, युव्हेंट्सकडून खेळण्यासाठी रोनाल्डोला दरवर्षी 60 मिलियन डॉलर (450 कोटी रुपये) मिळतात. तसेच नायकीसोबत (Nike) रोनाल्डोने 7500 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं आहे.

    2013मध्ये रोनाल्डोने स्वतःचा CR7 नावाचा स्वतःचा ब्रांड लाँच केला होता. या क्लोदिंग ब्रांडसह 2015 मध्ये त्याने फूटविअर ब्रँडदेखील सुरू केला. रोनाल्डोने एडम परफ्यूम सोबत मिळून ख्रिस्तियानो लेगेसी नावाची परफ्यूम रेंज लाँच केली आहे. तसेच रोनाल्डोने 2016मध्ये हेल्थ क्लब क्रंचसोबत मिळून CR7 जिमची चेन लाँच केली. या जिमच्या अनेक ब्रांच जगभरात सुरू केल्या जाणार आहेत. रोनाल्डोने पोर्तुलगच्या सर्वात मोठ्या हॉटेल ग्रूपसोबत मिळून CR7 नावाची लक्झरीअस हॉटेल्सची चेन सुरू केली. यामध्ये त्याने 530 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती आहे. याशिवाय रोनाल्डोने 2017मध्ये 7EGEND नावाची एक टेक्नोलॉजी कंपनी सुरू केली. ही कंपनी डिजीटल सोल्यूशन्सवर काम करते.

    First published:

    Tags: Lifestyle, Mumbai, Sports