Home /News /news /

IAS Officer Salary: नक्की किती असतो एका IAS अधिकाऱ्याचा पगार? कोणत्या सुविधांचा मिळतो लाभ? वाचा

IAS Officer Salary: नक्की किती असतो एका IAS अधिकाऱ्याचा पगार? कोणत्या सुविधांचा मिळतो लाभ? वाचा

प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा द्यावी लागते. ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.

    नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : देशाची सेवा करणं हे अनेकांचे ध्येय असतं. त्यासाठी अनेक जण सैन्यात जातात, तर काहीजण प्रशासकीय सेवेचा (Administrative services) मार्ग स्वीकारतात. देश चालवण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या व्यवस्थेत विविध गटातील आणि विविध स्तरावरील अधिकारी यंत्रणा असते. देशाचा गाडा सुरळीत चालण्यासाठी ही व्यवस्था अत्यंत महत्त्वाची असते. यामध्ये प्रशासन, पोलीस आणि परदेश व्यवहार अशा तीन प्रमुख सेवा वर्ग आहेत. प्रशासकीय अधिकारी हा देशाच्या प्रशासन यंत्रणेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा द्यावी लागते. ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी देशातील लाखो तरुण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसतात. याकरता अनेक वर्षे कठोर अभ्यास करून परीक्षा देतात. काहीजण पहिल्या फटक्यात उत्तीर्ण होतात तर काहींना अनेकदा प्रयत्न करावे लागतात. अनेकांना अपयशही येते. या परीक्षेत भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) यासह 25 पेक्षा जास्त सेवांचा समावेश होतो. या परीक्षेतील यशस्वी उमेदवारांची नियुक्ती भारतीय प्रशासकीय सेवा (IAS),भारतीय पोलीस सेवा (IPS)आणि भारतीय फॉरेन सर्व्हिसेस (IFS)सारख्या सेवा क्षेत्रात केली जाते. देशातील सर्वांत उच्च श्रेणीतील सेवांमध्ये या यंत्रणेचा समावेश होतो. अत्यंत मानाची अशी सेवा मानली जाते. त्यामुळे अगदी डॉक्टर, इंजिनीअर, वकील यांसारख्या व्यवसायांशी निगडित असणारी मुले, मुलीही आपल्या चांगल्या नोकऱ्या आणि लाखो रुपयांची पॅकेजेस सोडून लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जातात. एवढे असे या नोकऱ्यांमध्ये काय आहे? या पदावरील व्यक्तींना किती पगार मिळतो असे अनेक प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात येतो. वन इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा,मुलाखत या सर्व फेऱ्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच आयएएस रँक (IAS Rank) मिळविणाऱ्या उमेदवारांना देशातील प्रशासन व्यवस्थेत काम करण्याची संधी मिळते. जिल्हाधिकारी (Collector), जिल्हा दंडाधिकारी (District Magistrate) ते कॅबिनेट सचिव (Cabinet Secretary)बनण्याची संधी त्यांना मिळते. कॅबिनेट सचिव हे पद आयएएस अधिकाऱ्याचे सर्वोच्च पद आहे. आयएएस अधिकाऱ्यांना उत्तम पगाराचे पॅकेज आणि इतर अनेक सुविधाही मिळतात. 7 व्या वेतन आयोगानुसार आयएएस अधिकाऱ्याला 56,100 रुपये मूळ वेतन आहे. त्यासोबतच इतर अनेक भत्तेही दिले जातात. त्यामुळे एका आयएएस अधिकाऱ्याचा एकूण पगार दरमहा एक लाख रुपयांपेक्षा जास्त असतो. त्याच वेळी, आयएएसच्या वरिष्ठ कॅबिनेट सचिवांचा दरमहा पगार 2 लाख 50 हजारांपर्यंत असतो. आयएएस श्रेणीतील अधिकाऱ्याचा हा सर्वाधिक पगार आहे. पगाराव्यतिरिक्त या अधिकार्‍यांना राहण्यासाठी घर, स्वयंपाकी आणि मदतीसाठी इतर कर्मचारी तसेच वाहन आणि ड्रायव्हरची सुविधाही मिळते. WhatsApp Payment करण्यापूर्वी ही बातमी वाचाच चांगला पगार आणि इतर सुविधा असल्या तरी या पदाला असणारा मान, प्रतिष्ठा सगळ्यात मोठी असते. एखाद्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळालेल्या आयएएस अधिकाऱ्याला असणारे अधिकार, मान अत्यंत मोलाचा असतो. नागरिकांना शांततेत आणि सुरक्षितपणे जगता यावे यासाठी सर्व संबधित यंत्रणांशी समन्वय साधून उत्तम प्रशासन चालवण्याची जबाबदारी त्याची असते. ती यशस्वीपणे पार पाडणे हे मोठे आव्हान असते. ते पूर्ण केल्यानंतर मिळणारे समाधान अत्यंत मोलाचे असते. तर कॅबिनेट सचिवसारख्या उच्च पदाची जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकारी देशाचा कारभार चालवणारे मंत्रिमंडळ आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय साधत असतो. परदेश व्यवहार सेवेतील अधिकारी आपल्या आणि इतर देशांमधील संबंध सुरळीत राखण्याच्या कामात मोलाची कामगिरी बजावत असतात. तर सर्वत्र कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सेवेतील अधिकारी महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतात. याशिवाय अनेक सेवांमध्ये या अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान असते. त्यामुळे लाखो तरुण-तरुणी देशसेवेचे आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासकीय सेवेची निवड करतात.
    First published:

    Tags: Ias officer, Salary

    पुढील बातम्या