भोईवाडा कोर्टात न्यायाधिशासमोरच आरोपीवर चाकू हल्ला !

भोईवाडा कोर्टात आज थेट न्यायाधीशांसमोरच आरोपींवर चाकू हल्ला झालाय. विशेष म्हणजे तक्रारदारानेच हा हल्ला केला असून, हल्ला झाला तेव्हा न्यायाधीश कोर्टातच उपस्थित होते. या हल्ल्यात दोन आरोपी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी हल्लेखोराला तात्काळ अटक केलीय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 22, 2017 04:11 PM IST

भोईवाडा कोर्टात न्यायाधिशासमोरच आरोपीवर चाकू हल्ला !

22 नोव्हेंबर, मुंबई : भोईवाडा कोर्टात आज थेट न्यायाधीशांसमोरच आरोपींवर चाकू हल्ला झालाय. विशेष म्हणजे तक्रारदारानेच हा हल्ला केला असून, हल्ला झाला तेव्हा न्यायाधीश कोर्टातच उपस्थित होते. या हल्ल्यात दोन आरोपी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी हल्लेखोराला तात्काळ अटक केलीय.

याबाबतची सविस्तर हकिगत अशी की, आज दुपारी एका मारहाणीच्या प्रकरणातील तीन आरोपींना भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सुनावणीनंतर न्यायालयाने या आरोपींना जामीन मंजूर केला. न्यायालयाने जामीन मंजूर करताच तक्रारदाराने आपल्या हातातील चाकूने दोन आरोपींवर हल्ला केला. हल्ल्यात दोन्ही आरोपी जखमी झाले असून, त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्ला करणाऱ्या तक्रारदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान तक्रारदार चाकू घेऊन कोर्टात कसा काय आला ? लोक कोर्टरूममध्ये येत असताना पोलीस त्यांची तपासणी करत नाहीत का ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2017 04:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...