IPL 2019 : शेवटच्या चेंडूवर नितीशचा सिक्सर...तरी बंगळुरूनं जिंकला सामना

IPL 2019 : शेवटच्या चेंडूवर नितीशचा सिक्सर...तरी बंगळुरूनं जिंकला सामना

प्ले ऑफमध्ये जाण्याचे आव्हान मात्र जवळजवळ संपुष्टात आले आहे.

  • Share this:

कोलकाता, 19 एप्रिल : पहिल्या आठ सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये पराभव स्वीकारल्यानंतर, आजच्या सामन्यात केवळ कर्णधार विराटचा जलवा पाहायला मिळाला. विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर आणि मोईन अलीच्या शेवटच्या ओव्हरमुळं बंगळुरूनं सामना जिंकला. पण प्ले ऑफमध्ये जाण्याचे आव्हान मात्र जवळजवळ संपुष्टात आले आहे.

शेवटच्या एका चेंडूवर 17 धावांची गरज असताना, नितीश राणानं षटकार ठोकला. मत्र तरी सामना बंगळुरूनं जिंकला. नितीश राणानं नाबाद 85 धावा केल्या तर, रसेलनं 25 चेंडूत 65 धावा केल्या. या दोघांच्या या खेळीच्या जोरावर कोलकाता शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्यात जिवंत होता.

बंगळुरूकडून स्टाईनिसनं आणि डेल स्टेननं उत्तम गोलंदाजी केली.

सलामीवीर ख्रिस लिन, सुनील नरिन आणि शुभमन गिल हे फलंदाज फारशी चांगली कामगिरी करु शकले नाहीत. डेल स्टेन आणि नवदीप सैनीने त्यांना माघारी धाडलं. यानंतर भरवशाचा रॉबिन उथप्पाही झटपट माघारी परतला. यानंतर मैदानात आलेल्या नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये ते अपयशी ठरले.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा दिनेश कार्तिकचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर पार्थिव पटेल आणि अक्षदीप नाथ झटपट माघारी परतले. मात्र यानंतर विराट कोहली आणि मोईन अली यांनी तिसऱ्या विकेटसाठी धडाकेबाज अर्धशतकी भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी कोलकात्याच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. या भागीदारीमुळेच बंगळुरुने आजच्या सामन्यात आश्वासक धावसंख्येचा पल्ला गाठला. कोलकात्याकडून सुनील नरीन, आंद्रे रसेल, हॅरी गुर्ने आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर बंगळुरू संघानं 200च्या टप्पा गाठला. विराटचे हे पाचवे आयपीएल शतक आहे. 57 धावांत विराटनं आपलं शतक पुर्ण केलं. धावांच्या जोरावर बंगळुरू संघानं कोलकाता समोर धावांचे 218 आव्हान ठेवले आहे.

VIDEO : 'जयकांत शिक्रे'नी सांगलीत घेतली 'या' उमेदवारासाठी विराट रॅली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 19, 2019 07:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading