विराटने गोळीच्या वेगाने मारलेला चेंडू कुलदीप यादवने 'असा' पकडला, पाहा VIDEO

विराटने गोळीच्या वेगाने मारलेला चेंडू कुलदीप यादवने 'असा' पकडला, पाहा VIDEO

विराट कोहलीने 49 चेंडूत 84 धावांची वेगवान खेळी केली.

  • Share this:

बेंगळुरू, 05 एप्रिल : चिन्नास्वामी स्टेडियमवर एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहलीच्या वादळी खेळीच्या जोरावर आरसीबीने केकेआरला 206 धावांचं आव्हान दिलं. कोलकाता नाइट रायडर्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि पार्थिव पटेल यांनी सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली. दोघांनी 7.5 षटकांत 64 धावांची भागिदारी केली. नितीश राणाने पार्थिव पटेलला पायचित करून ही जोडी फोडली. त्याने 24 चेंडूत 25 धावा केल्या.

त्यानंतर कोहली आणि एबी डिव्हिलियर्सने शतकी भागिदारी केली. कोहलीला स्वत:च्या चेंडूवर झेल घेत कुलदीप यादवने बाद केले. हा फटका विराटने इतक्या जोरात मारला होता की गोळीच्या वेगाने चेंडू कुलदीप यादवच्या दिशेना आला. त्याने चपळाईने खाली बसत झेल पकडला आणि कोहलीची वादळी खेळी संपुष्टात आली. कोहलीने 49 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 84 धावा केल्या.

डिव्हीलियर्सने 32 चेंडूत 63 धावा केल्या. यात त्याच्या 5 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. विराटनंतर फलंदाजीला आलेल्या मार्कस स्टोइनसने 13 चेंडूत 28 धावा केल्या.

VIDEO : गावस्कर म्हणतात, कोहलीचा हा शॉट टी20 प्रकारातला नाही

First published: April 5, 2019, 10:48 PM IST

ताज्या बातम्या