मुंबई 14 जून: कलाकारांची चांगलीच कंबर
कसून घेणारा आणि त्यांचे कुकिंग स्किल पणाला लागावे अशा भन्नाट रेसिपी त्यांच्याकडून करून घेणारा (
Zee Marathi Shows) झी मराठीवरील एक प्रसिद्ध शो किचन कल्लाकार (
Kitchen Kallakar) तर आता सगळ्यांनाच माहित झाला आहे. नावाप्रमाणे मस्त मजेचा आणि चवीचा आनंद देणारा हा शो कलाकारांसाठी मात्र परीक्षेची वेळ घेऊन येतो. यात अनेक प्रसिद्ध कलाकारांना स्वतः शेफ होऊन अनेक चमचमीत पदार्थ बनवावे लागतात. पण या शो च्या चाहतवर्गाला न आवडणारी एक बातमी समोर येत आहे.
हा शो लवकरच ऑफ एअर होणार असं सांगितलं जात आहे. या शोचं wrap आज झालं अशी खबरसुद्धा समोर येत आहे. मराठी सिरियल्स ऑफिशियल या इन्स्टाग्राम पेजवरून याबद्दल माहिती देण्यात आली. किचन कल्लाकार हा शो अनेकांना प्रचंड आवडत आहे. या शो चा फॉरमॅट सुद्धा वेगळा असल्याने आपल्या आवडीच्या कलाकारांना वेगवेगळ्या रेसिपी बनवताना बघून अनेकांना फार गंमत वाटते. मात्र हा शो बंद होणार हे कळल्यावर अनेक चाहते नाराज झाले आहेत.

या शो मध्ये असलेले महाराज प्रशांत दामले, होस्ट संकर्षण कऱ्हाडे, राजशेफची धुरा सांभाळणाऱ्या प्रसिद्ध शेफ जयंती कठाळे आणि नादखुळा शेठ यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. महाराजांच्या आज्ञेवरून प्रत्येकाला एक पदार्थ बनवणं अनिवार्य असल्याने कलाकारांची होणारी तारांबळ पाहायला खूप मजा येते. राजशेफ यांच्या अमूल्य सल्ल्यांनी कलाकारांना मदत होतेच सोबत व स्क्रीन उत्तम अभिनय करणाऱ्या कलाकारांना असं आगळ वेगळं चॅलेंज करताना पाहून चाहत्यांचं मनोरंजन होतं.
हे ही वाचा- Amitabh Bachchanची नात जपानमध्ये साजरी करतेय सुट्टी, या अभिनेत्यासोबत अफेअर?
या कार्यक्रमात अनेक सुपरस्टार नावांनी आजपर्यंत हजेरी लावली आहे. ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, जेष्ठ अभिनेत्री शु भा खोटे, संजय मोने, संजय नार्वेकर अशा मातब्बर मंडळींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तसंच काही राजकीय मंडळींना सुद्धा या कार्यक्रमात येण्याचा मोह आवरता आला नव्हता. पंकजा मुंडे, चित्र वाघ, किशोरी पेडणेकर, रुपाली ठोंबरे, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस अशा अनेकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.
हा कार्यक्रम बंद झाल्यावर कोणता कार्यक्रम याची जागा घेणार यावर अजून स्पष्टीकरण मिळालं नसलं तरी या शो ची उणीव कायमच भासेल अशी प्रतिक्रिया समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.