Home /News /news /

तब्बल 12 तास केलं कीर्तन! 'वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया' मध्ये झाली नोंद

तब्बल 12 तास केलं कीर्तन! 'वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया' मध्ये झाली नोंद

ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर यांनी सलग सलग 12 तास 20 मिनिटानंतर कीर्तन संपवून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नावं कोरले आहे.

ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर यांनी सलग सलग 12 तास 20 मिनिटानंतर कीर्तन संपवून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नावं कोरले आहे.

ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर यांनी सलग सलग 12 तास 20 मिनिटानंतर कीर्तन संपवून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नावं कोरले आहे.

जुन्नर, 15 जून : जगात वेगवेगळ्या विषयांवरचे अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत, मात्र कीर्तनावर वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचे आपण ऐकलं नसेल. पुणे (pune) जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथील प्रसिद्ध कीर्तनकार, शिवचरित्र कथाकार ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर (H.B.P.Bajirao Maharaj Bangar) यांनी नुकताच शिवजन्मभूमी अशी ओळख असलेल्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे सलग 12 तास 20 मिनिटांचे कीर्तन करून या किर्तनाची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये (World Record of India ) नोंद केली आहे. कुठलाही सराव नसताना गेल्या 12 वर्षांपासून कीर्तन सेवा देणारे शिवचरित्र कथाकार ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेत पावनखिंडीच्या लढाईत 17  तास खिंड लढविणाऱ्या मावळ्यांची लढाई हीच त्यांची प्रेरणा ठरली. १७ तास मावळे लढाई करू शकतात, तर आपणही १२ तास कीर्तन करू शकतो. त्यानंतर बांगर महाराज यांनी सलग बारा तास कीर्तन करण्याचा निश्चय केला. तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील उपदेशपर प्रकरणातील 3 चरणाच्या अभांगवर समाज प्रबोधन करण्यासाठी त्यांनी विविध विषय निवडलले यात अनुक्रमे व्यसन,छत्रपती शिवाजी महाराज,श्रीराम प्रभू,तुकाराम महाराज,मराठी भाषा सध्य स्थिती आदींचा समावेश होता. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे प्रमुख पवन सोळंकी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियात सहभागासाठी हिरवा कंदील दर्शविला. नारायणगावचे सरपंच योगेश पाटे,जयहिंद ग्रुपचे सर्वेसर्वा विजय गुंजाळ, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, रमेश भोसले यांच्या सहकार्यातून नारायणगाव येथील मुक्ताई मंगल कार्यालय येथे 14 जून रोजी सकाळी 9 वाजता तुकाराम महाराजांच्या उपदेशपर प्रकरणातील 3 चरणांचा अभंग घेत कीर्तनाला प्रारंभ केला. सलग 12 तास 20 मिनिटानंतर कीर्तन संपवून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नावं कोरले आहे. (श्रेयस अय्यर हातावर K स्टिकर चिटकवून का खेळतोय? के अक्षरामागचं सिक्रेट उलगडलं!) या रेकॉर्डसाठी शेमेरो मराठी बाणा चॅनलचे सर्किट हाऊस प्रॉडक्शन दिग्दर्शक सुनील खेडेकर आणि समन्वयक प्रमोद रणनवरे यांच्या टीमने वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियासाठी थेट प्रक्षेपण केले. या वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियासाठी हभप बाजीराव महाराज बांगर यांना किरण महाराज बनकर, माऊली महाराज कुंजीर, नितीन महाराज सुक्रे, विशाल महाराज बांगर, विठ्ठल महाराज पोपळघट, विठ्ठल जाधव (चोपदार) व चंद्रकांत निकम (विणेकर) यांच्यासह २२ जणांची साथ लाभली. याचबरोबर टाळकरी, गायक, वादक यांनीही साथ दिली. 12 तास 20 मिनिटांचे वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर तुकाराम महाराजांचे दहावे वंशज माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे वतीने मेडल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. (नोकरी असो की व्यवसाय तुम्हालाच मिळेल यश ; 'या' टिप्स ठरतील Life Changing) यावेळी सरपंच योगेश पाटे, जयहिंद ग्रुपचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, माऊली खंडागळे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. हभप बाजीराव महाराज बांगर हे शिव शंभू चरित्र कथाकार म्हणून प्रसिद्ध असून कथाकार, कीर्तनकार, प्रबोधनकार, व्याख्याते, अभिनेते व लेखक म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान या राज्यात प्रसिद्ध आहेत. या वर्ल्ड रेकॉर्ड इंडियासाठी स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्यचे जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील कार्यकर्त्यांचे तसेच मुक्ताबाई - काळोबा देवस्थान ट्रस्ट,ग्रामपंचायत नारायणगावचे सरपंच बाबूभाऊ पाटे यांचे विशेष सहकार्य लाभले, अशी माहिती जयहिंद ग्रुपचे सचिव विजय गुंजाळ यांनी दिली.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या