डीएसकेंनी 1200 कोटींचा घोटाळा केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप

पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात आता भाजपचे खासदार किरिट सोमय्या यांनीही आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल केलीय. डीएसकेंनी तब्बल 1200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2017 01:49 PM IST

डीएसकेंनी 1200 कोटींचा घोटाळा केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई, 19 ऑगस्ट : पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात आता भाजपचे खासदार किरिट सोमय्या यांनीही आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल केलीय. डीएसकेंनी तब्बल 1200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री, अर्थ मंत्रालय आणि PF आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. तसंच डीएसकेंनी 2015 सालापासून 750 कर्मचाऱ्यांचा पीएफ देखील जमा केला नसल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय.

डीएसकेंनी लघू गुंतवणूकदारांनाही फसवलं असल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय... दरम्यान, याबाबत गुंतवणूकदारांनी शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार केलीय. शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रारींचे सहा अर्ज आलेत. ज्यामध्ये डीएसकेंनी घेतलेल्या गुंतवणुकीवर ठरल्याप्रमाणे व्याजही दिलं नसल्याचा आणि मुदत ठेवीच्या रकमाही परत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. या सगळ्या प्रकरणाचा अभ्यास करून सरकारी वकिलांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई करणार असल्याचं शिवाजीनगर म्हटलंय.

डीएसके यांच्यावर 8 हजार गुंतवणूकदारांना फसवल्याचा आरोप होतोय. या गुंतवणूकदारांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी फिक्स डिपॉजिट म्हणून डीएसकेंच्या गृहउद्योग प्रकल्पात गुंतवलीय. पण गेल्या १० महिन्यापासून या गुंतवणूकदारांना एक रुपयांचंही व्याज मिळत नसल्याने हे सर्व गुंतवणूदार हवालदिल बनलेत. दरम्यान, डीएसके मात्र, नोटबंदीमुळे आपण आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याचं सांगत फिरताहेत. तर तक्रारकर्ते डीएसकेंनी पुण्याजवळच्या ड्रीम सिटी जमीन घोटाळ्यात आपल्या कुटुंबियांना आर्थिक फायदा करून दिल्यानेच त्यांच्यावर ही आर्थिक मंदीची परिस्थिती ओढवल्याचा आरोप करताहेत. एकूणच 'घराला घरपण देणारी माणसं' अशी कॅची टॅगलाईन देऊन पुणेकरांमध्ये मानाचं स्थान मिळवणाऱ्या डीएसकेंनाच आता आर्थिक घरघर लागलीय असंच इथं खेदाने नमूद करावं लागतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2017 01:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close