कर्नाटकच्या कैगा गावात चक्क बाटलीतून किंग कोब्राला पाजलं पाणी

कर्नाटकातल्या कैगा गावातील चक्क किंग कोब्राला थंडगार पाणी पाजलं आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडिवर व्हायरल झाला आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 30, 2017 04:47 PM IST

कर्नाटकच्या कैगा गावात चक्क बाटलीतून किंग कोब्राला पाजलं पाणी

30 मार्च : दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत चालला आहे, आणि तहानलेल्याला पाणी पाजणं ही आपली संस्कृती आहे. त्यात प्राणिमात्रांवर दया करणं हा मानवताधर्म आहे. कर्नाटकातल्या कैगा गावातील चक्क किंग कोब्राला थंडगार पाणी पाजलं आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडिवर व्हायरल झाला आहे.

सध्या राज्यासह देशाभरात पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक होरपळत आहेत. प्राणीही त्याला अपवाद नाहीत. त्यांची अवस्था तर अधिकच बिकट आहे.

असाच तहानेनं व्याकूळ झालेला एक किंग कोब्रा कैगा गावात शिरला. महाभयंकर साप गावात आल्याच्या बातमीनं स्वाभाविकच हाहाकार उडाला. गावकरी, सर्पमित्र, पोलीस त्याला शोधायला धावल्यानं तो लगेचच सापडला. १२ फूट लांबीचा हा खतरनाक साप पाहून अनेकांचे डोळेही फिरले. पण, कोब्राची अवस्था पाहून, तो पाण्यासाठी गावात आल्याचं सर्पमित्रांच्या लक्षात आलं. इतक्यात, एका पोलिसानं थंडगार पाण्याची बाटली मागवली अन् न घाबरता कोब्राला पाणी पाजलं. त्याच्या फण्यावर पाणी टाकलं. ते दृश्य पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2017 02:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...