आग्रा-लखनऊ द्रुतगती महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू 31 जखमी

आग्रा-लखनऊ द्रुतगती महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू 31 जखमी

बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते. सर्व जखमींना रुग्णालयात हलविण्यात आलं आहे

  • Share this:

फिरोजाबाद, 13 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील आग्रा-लखनऊ महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असून 31 जणांवर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहे.  उत्तरप्रदेशच्या फिरोजाबादमधील आग्रा-लखनऊ द्रुतगती मार्गावर डबल डेकर बस थेट मोठ्या ट्रकमध्ये शिरला आहे. या घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य 31 जणांना सैफई मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ही घटना फिरोजाबाद इटावा हद्दीजवळील आग्रा-लखनऊ द्रुतगती मार्गावर रात्री दहाच्या सुमारास घडली. UP53FT4629 या क्रमांकाच्या खाजगी डबल डेकर बसने रस्त्यावर उभी केलेल्या 22 चाकांच्या ट्रकला धडक दिली. ट्रक क्रमांक UP22AT3074 आहे, जो पंक्चरमुळे रस्त्याच्या कोपऱ्यात उभा होता.

एसएसपी सचिंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते. सर्व जखमींना रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. सैफई हॉस्पिटलमधील इमर्जन्सी वॉर्डचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्व दीपक म्हणाले, 'किमान 31 जखमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 13 जणांना मृत अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत घटनेचे नेमके कारण कळू शकले नाही. ड्रायव्हरला झुलकी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. कारण आग्रा-लखनऊ द्रुतगती महामार्ग हा खूपच विस्तृत रस्ता आहे, सध्या हवामान देखील स्पष्ट आहे, अशा परिस्थितीत धुकं नसतात, घटनेचे नेमके कारण तपासल्यानंतरच कळू शकेल, असं एसएसपी सचिंद्र यांनी सांगितले.

First published: February 13, 2020, 7:40 AM IST
Tags: accident

ताज्या बातम्या