'त्यांना थेट गोळ्या घालून मारा', मुख्यमंत्र्यांचा फोनवर बोलतानाचा VIDEO व्हायरल

'त्यांना थेट गोळ्या घालून मारा', मुख्यमंत्र्यांचा फोनवर बोलतानाचा VIDEO व्हायरल

'ज्या लोकांनी मारलं त्यांनाही तसंच गोळ्या घालून संपवा. जे होईल ते बघू नंतर. मला काही फरक नाही पडत...'

  • Share this:

कर्नाटक, 25 डिसेंबर : कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी हे एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. खरंतर सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यात ते जेडीएस कार्यकर्त्याची हत्या करणाऱ्या आरोपींना गोळ्या घालून मारून टाका असं ते म्हणत आहेत.

जेडीएसचे जिल्हा स्तरीय सदस्य होन्नालहेरे प्रकाश यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांची गाडी थांबवून त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात होन्नालहेरे प्रकाश यांचा जागीच मृत्यू झाला.

होन्नालहेरे प्रकाश हे एक कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ता होते. त्यांना स्मरताना कुमारस्वामी म्हणाले, 'माणूस म्हणून ते खूप चांगले होते. पण गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली हे ऐकून मी हादरलो आहे. मी खूप अस्वस्थ आहे. असं कोणीही कोणाची हत्या करू शकत नाही. मला माहिती नाही तुम्ही यावर काय अॅक्शन घेणार आहात. ते तुमचं काम आहे तुम्ही करा. पण ज्या लोकांनी मारलं त्यांनाही तसंच गोळ्या घालून संपवा. जे होईल ते बघू नंतर. मला काही फरक पडत नाही...' दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओ क्लिपच्या सत्यतेची आम्ही अद्याप पडताळणी केलेली नाही.

हे सगळं बोलतानाचा कुमारस्वामी यांचा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे. कुमारस्वामींना या वक्तव्यासंदर्भात विचारलं असता, 'मी तेव्हा खूप रागात होतो. असं कोणी कोणाला मारू शकत नाही. मला जेव्हा ही घटना समजली तेव्हा मला खूप राग आला होता. अशा परिस्थितीत प्रत्येकाची अशीच भूमिका असते. त्यातही प्रकाश यांना मारणारे हे तेच लोक आहेत ज्यांनी याआधीही 2 जणांच्या हत्या केल्या आहेत. ते जामिनावर जेलमधून बाहेर आले आहेत. मृत प्रकाश हा एक भला माणूस होता. तो समाजकल्याणामध्ये नेहमी सक्रिय असायचा' असं कुमारस्वामी म्हणाले आहेत.

प्रकाश यांच्या हत्येचा विरोध करण्यासाठी जेडीएस कार्यकर्त्यांनी सोमवारी संध्याकळच्या सुमारास बंगळुरू-मैसुरू आणि बंगळुरू-डिंडिगल हायवेवर मोठं आंदोलन केलं. राजकारणातल्या वैरामुळे प्रकाश यांची हत्या केल्याचा आरोप जेडीएस कार्यकर्त्यांकडून लगावण्यात आला आहे.


VIDEO: 'मला मराठी येत नाही, हिंदीत बोला', महापौर कलानी वादाच्या भोवऱ्यात


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2018 09:56 AM IST

ताज्या बातम्या