काळजाचा थरकाप! मित्राने केलं अपहरण, हत्या करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले...

काळजाचा थरकाप! मित्राने केलं अपहरण, हत्या करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले...

खंडणी मागण्यापूर्वीच पीडितेचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे आरोपीने मित्राच्या मृतदेहाचे तुकडे करून त्यांला प्रेशर कुकरमध्ये जाळलं.

  • Share this:

आगरा (उत्तर प्रदेश), 15 नोव्हेंबर : एका व्यक्तीने 50 लाखांच्या खंडीणीसाठी आधी मित्राचे अपहरण केले. पण खंडणी मागण्यापूर्वीच पीडितेचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे आरोपीने मित्राच्या मृतदेहाचे तुकडे करून त्यांला प्रेशर कुकरमध्ये जाळलं. या सगळ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगरा येथील किरावली येथे राहणारे धर्मेंद्र तिवारी हा संगणक ऑपरेटर होते. ते 18 ऑक्टोबरला अचानक बेपत्ता झाले होते. बरीच शोधा-शोध केल्यानंतरही त्यांचा न लागल्याने धर्मेंद्रच्या वडिलांनी अचनेरा पोलिस ठाण्यात हरवल्याचा अहवाल नोंदविला.

पोलिस तपासात धर्मेंद्र अखेर ललित नावाच्या युवकाबरोबर दिसला होता. हे व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होतं. त्यानंतर ललितची ओळख पटली. यानंतर पोलिस बिचपुरी मार्गावरील मंगोलिया कॉलनीतील ललित बोडला यांच्या घरी पोहोचले. ललित त्याची आई शालिनी आणि भाऊ रोहितसोबत राहतो. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

इतर बातम्या - रायगडमध्ये कंपनीत भीषण स्फोट, 18 जखमी तर 5 जण गंभीर भाजले

पोलिसांनी दोघांची काटेकोरपणे चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. कर्ज फेडण्यासाठी ललितने 50 लाखांची खंडणी वसूल करण्यासाठी धर्मेंद्रचे अपहरण केले. ललितने धर्मेंद्रला काही निमित्त देऊन घरी बोलावले. त्याला कॉफी दिली आणि नंतर त्याला इंजेक्शन दिले. यानंतर धर्मेंद्र बेशुद्ध झाला. ललितने धर्मेंद्रचे हातपाय आणि तोंड टेपने बांधले आणि खोलीत बंद केले.

इतर बातम्या - 'तेरे मिलने को न आएंगे सनम' जितेंद्र आव्हाडांनी गायलं राऊतांच्या मनातलं गाणं

तोंड बाधलं असल्यामुळे धर्मेंद्रचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला. जेव्हा ललितला हे कळले तेव्हा तो घाबरला. त्यानंतर ललितने धर्मेंद्रच्या शरीराचे लहान तुकडे केले आणि घरात ठेवले. नंतर आरोपींनी हे तुकडे कुकरमध्ये शिजवले. शरीराचे मोठे भाग त्याने नाल्यात फेकले. पोलिसांनी ललितची कसून चौकशी केली असता या सगळ्या प्रकाराचा खुलासा झाला.

इतर बातम्या - आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही, चंद्रकांत पाटलांच्या दाव्याने खळबळ

Published by: Renuka Dhaybar
First published: November 15, 2019, 7:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading