अपहरणकर्त्याच्या अवघ्या सहा तासांत पोलिसांनी आवळल्या मुसक्या, तीन वर्षीय चिमुरडीची सुखरुप सुटका

अपहरणकर्त्याच्या अवघ्या सहा तासांत पोलिसांनी आवळल्या मुसक्या, तीन वर्षीय चिमुरडीची सुखरुप सुटका

भिवंडी शहरातील देऊनगर येथील चाळीत राहणारे मोहमद इरशाद इद्रिस अन्सारी यांची तीन वर्षांची मुलगी आलिया हिचे अपहरण झाले होते. पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळल्या.  त्याला जेरबंद करुन आलियाची सुखरुप सुटका केली.

  • Share this:

रवी शिंदे, (प्रतिनिधी)

भिवंडी,9 मे - शहरातील देऊनगर येथील चाळीत राहणारे मोहमद इरशाद इद्रिस अन्सारी यांची तीन वर्षांची मुलगी आलिया हिचे अपहरण झाले होते. पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळल्या.  त्याला जेरबंद करुन आलियाची सुखरुप सुटका केली.

आलिया बुधवारी रात्री 9 वाजता  घरात खेळत असताना आरोपी अब्दुल कलाम अजीज चौधरी आला.  आलियाला अंडी खायला घेऊन जातो, असे सांगत घराबाहेर घेऊन गेला तो परत आलाच नाही. आलियाची शोधाशोध करून ती आढळून न आल्याने मोहम्मद इरशाद अन्सारी याने भोईवाडा पोलीस ठाण्यात रात्री अकरा वाजता तक्रार दाखल केली व संशयित म्हणून अब्दुल अजीज चौधरी याचे नाव दिले. या गुन्ह्याच्या नोंदीनंतर पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी पोलिसांचे पाच पथक या मुलीच्या तपासकामी कल्याण रेल्वे स्टेशन, डोंबिवली व त्याच्या नेहमीच्या ठिकाणी रवाना केले. दरम्यानच्या काळात त्याच्या मोबाइल लोकेशनचा तांत्रिक तपास करताना वालवली (बदलापूर पश्चिम) या ठिकाणी दाखविल्यावर पोलिसांनी सर्व पथके त्या ठिकाणी एकत्रित होऊन तेथील एका खोलीवर छापा टाकला. अपहरणकर्त्यास ताब्यात घेत त्याच्या तावडीतून चिमुरडी आलियाची सुखरूप सुटका करण्यात भोईवाडा पोलिसांना यश आले आहे.

पुण्यात 'सैराट'ची पुनरावृत्ती, पाहा हा SPECIAL REPORT

First published: May 9, 2019, 9:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading