मुंबई, 16 मे- नेटफ्लिक्सची मालिका ‘लस्ट स्टोरीज’मधील किआरा आडवाणीचा एक सीन फार चर्चेत आला होता. या सीनमध्ये कभी खुशी कभी गम सिनेमातील गाणं सुरू असतं. या सीनमुळे किआराच्या नावाची तुफान चर्चा झाली. एका चॅट शोदरम्यान किआराने जेव्हा तिच्या आजीने ही सीरिज पाहिली तेव्हाची तिची रिअक्शन कशी होती याबद्दल सांगितले.
किआरा म्हणाली की, ‘माझी आजी माझ्यासोबत रहायला आली होती. त्याचदरम्यान, नेटफ्लिक्सची लस्ट स्टोरी रिलीज झाली होती. मी ही सीरिज पाहिली होती आणि माझ्या आई- बाबांनीही ही सीरिज पाहिली होती. सगळ्यांनाच ही सीरिज आवडली. माझ्या त्या सीनबद्दल आई- वडिलांनी फार विचार केला नाही. जेव्हा मी या सिनेमाला हो बोलले होते तेव्हा त्यांना या गोष्टीची कल्पना होती.’
…म्हणून शाहरुखच्या पार्टीत विकी कौशलसोबत या कलाकारांनाही वाटत होतं पडद्याच्या मागे जाऊन लपावं
माझी आजी अँग्लो इंडियन आहे. त्यामुळे तिला काही गोष्टी कळल्या नाहीत. ती सिनेमात येणारे सब- टायटल वाचत होती. प्रत्येकजण यावर हसत होते. मला अनेक लोकांकडून प्रतिक्रिया मिळत होत्या. माझी आजी जेव्हा तो सीन पाहत होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. ती शुन्य नजरेने ती सीरिज पाहत होती. त्यामुळे आजीला सीरिज आवडली की नाही हे मला कळत नव्हतं. म्हणून मी माझ्या आईला तिला त्या सीनबद्दल समजावून सांगायला सांगितलं.
शुटिंगवेळी या 5 अभिनेत्यांचा झालेला अपघात, विकीला तर पडले 13 टाके
लवकरच किआरा ‘कबीर सिंग’ या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती शाहिद कपूरसोबत दिसणार आहे. संदीप वांगा दिग्दर्शित २१ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दाक्षिणात्य सिनेमा ‘अर्जुन रेड्डी’चा ‘कबीर सिंग’ हा सिनेमा अधिकृत रिमेक आहे.
पुलवामातील 3 दहशतवाद्यांच्या एन्काउंटरनंतरचा LIVE VIDEO