पुण्यात 'सोवळे'फेम डॉ. खोले यांच्याविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन

पुण्यात 'सोवळे'फेम डॉ. खोले यांच्याविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन

अंधश्रद्धेला खतपाणी घालून समाजात तेढ निर्माण करीत असल्याबद्दल हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने केली. शिवाजी नगर येथील डॉ. खोले यांच्या निवास स्थानासमोर राष्ट्रवादी युवती कॉग्रेसने हे निषेध आंदोलन केलं.

  • Share this:

पुणे, 8 सप्टेंबर : अंधश्रद्धेला खतपाणी घालून समाजात तेढ निर्माण करीत असल्याबद्दल हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने केली. शिवाजी नगर येथील डॉ. खोले यांच्या निवास स्थानासमोर राष्ट्रवादी युवती कॉग्रेसने हे निषेध आंदोलन केलं. डॉ. मेधा खोले यांनी त्यांच्या स्वयंपाकिन बाई निर्मला यादव याच्यावर स्वतःची जाच लपवल्याचा आरोप करत सोवळं मोडल्याच्या आरोप केलाय. डॉ. खोले यांनी निर्मला यादव यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केलाय. घरकाम करताना निर्मला यादव यांनी जात लपवल्याचा आरोप खोले यांनी केलाय. याच प्रकरणावरून आज दिवसभर सोशल मीडियावर डॉ. खोले यांच्याविरोधात तीव्र टीका होतेय. खोले यांच्या या कृत्याने महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला तडा गेल्याची भावना समाजात निर्माण झालीय.

नेमकं काय आहे प्रकरण ?

पुणे आयएमडीच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी सणाचा स्वयंपाक करण्यासाठी एक स्वयंपाकिन ठेवली होती. या बाईंनी खोले यांच्याकडे कामावर रुजू होताना स्वतःची जात लपवल्याचा आरोप खोले यांनी केलाय. खोले यांना श्राद्ध आणि गौरी गणपतीच्या नैवद्य बनवण्यासाठी ब्राह्मण सुवासिनीच हवी होती. पण निर्मलाबाईंनी स्वतःची जात मराठा ही जात लपवून ठेवली. त्यांच्या या कृत्यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्या आरोप डॉ. खोले यांनी केलाय. तशी रितसर तक्रारच त्यांनी पोलिसात दाखल केलीय. खोले यांच्या तक्रारीवरून त्यांची कर्मट मानसिकताच अधोरेखित होत असल्याचा आरोप होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2017 07:23 PM IST

ताज्या बातम्या