IBN लोकमत इम्पॅक्ट : खाशाबा जाधव कुस्ती संकुलासाठी 3 कोटी मंजूर

IBN लोकमत इम्पॅक्ट : खाशाबा जाधव कुस्ती संकुलासाठी 3 कोटी मंजूर

ऑलिम्पिक कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचं रखडलेलं कुस्ती संकुल तात्काळ मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने तातडीने 3 कोटींचा निधी मंजूर केलाय. खाशाबा जाधव यांचं ऑलिम्पिक पदक लिलावात काढल्याची बातमी आयबीएन लोकमतने दाखवताच सरकार खडबडून जागं झालंय.

  • Share this:

मुंबई, 31 जुलै : ऑलिम्पिक कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचं रखडलेलं कुस्ती संकुल तात्काळ मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने तातडीने 3 कोटींचा निधी मंजूर केलाय. खाशाबा जाधव यांचं ऑलिम्पिक पदक लिलावात काढल्याची बातमी आयबीएन लोकमतने दाखवताच सरकार खडबडून जागं झालंय. कै. खाशाबा जाधव यांचे चिंरजीव रणजित जाधव आणि अतुल भोसले यांनी आज विनोद तावडे यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही या बैठकीला हजर होते. या बैठकीत कै. खाशाबा जाधव संकुलासंबंधीच्या सर्व बाबी तातडीने मार्गी लावण्यात आल्या.

बैठकीतील 4 महत्वाचे निर्णय

1. ऑलम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव कुस्ती संकुल तातडीने उभारण्याचा सरकारचा निर्णय, संकुलासाठी 3 कोटी रुपये मंजूर

2. खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मश्री किंवा पद्मभूषण पुरस्कार मिळावा, यासाठी राज्य सरकार केंद्राकडे शिफारस करणार

3. गेल्या 3 वर्षांपासून रखडलेली कै. पै. खाशाबा जाधव राज्यकुस्ती चषक स्पर्धा यावर्षी डिसेंबर महिन्यात घेतली जाणार, क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या बोरिवली मतदार संघातच स्पर्धा होणार

4. खाशाबा जाधव यांच्या संघर्षमयी जीवनावरील धडा CBSE च्या अभ्यासक्रमात घेतला जावा, यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जाबडेकर यांच्याकडे शिफारस करणार

First published: July 31, 2017, 5:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading