S M L

एकनाथ खडसे - पृथ्वीराज चव्हाणांच्या एकत्रित विमानप्रवासाने राजकीय चर्चांना उधाण

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल औरंगाबाद ते दिल्ली एकत्र विमानप्रवास केल्याची माहिती समोर आलीय. स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनीच न्यूज18 लोकमतशी बोलताना या माहितीला दुजोरा दिलाय.

Chandrakant Funde | Updated On: Jan 31, 2018 08:45 PM IST

एकनाथ खडसे - पृथ्वीराज चव्हाणांच्या एकत्रित विमानप्रवासाने राजकीय चर्चांना उधाण

31 जानेवारी, नवी दिल्ली : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल औरंगाबाद ते दिल्ली एकत्र विमानप्रवास केल्याची माहिती समोर आलीय. स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनीच न्यूज18 लोकमतशी बोलताना या माहितीला दुजोरा दिलाय. या सव्वादोन तासांच्या विमान प्रवास सुरू करण्याअगोदर विमानतळावर मोहन प्रकाश. मी एकनाथ खडसेंनी एकत्रित कॉफी देखील घेतल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाणांनी आवर्जून सांगितलं. या विमान प्रवासादरम्यान खडसेंसोबत कोणतीही औपचारिक राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. पण एकूणच खडसेंची आपल्याच भाजप पक्षावर असलेली नाराजी लक्षात घेता, या दोघांमध्ये 'कॉपी पे चर्चा'दरम्यान, कुठलाही राजकीय विषय निघालाच नाही, या चव्हाणांच्या दाव्यावर विश्वास ठेवणं अनेकांना जड जातंय. कारण या कॉफी पे चर्चामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश देखील सामिल झाले होते, त्यामुळे खडसेंच्या काँग्रेस प्रवेशासंबंधीच्या राजकीय चर्चांना पुन्हा ऊत आलाय.

कारण गेल्याच आठवड्यात अशोक चव्हाण यांनी एकनाथ खडसेंना काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली होती. अर्थात खडसेंनी यासंबंधीचं वृत्त नाकारलं असलं तरी खडसे भाजपात अस्वस्थ असल्याचं काही लपून राहिलेलं नाही. किंबहुना आजच एकनाथ खडसेंनी दिल्लीत जाऊन नितीन गडकरींची भेट घेतलीय. त्यांच्यासोबत ब्रेकफास्ट देखील घेतलाय. त्यामुळे नाराज खडसेंना भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नेमका काय सल्ला दिला असणार, यावर राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झालीय. तसंच अशा राजकीय परिस्थितीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी या म्हणण्यासाठी निव्वळ योगायोग असले तरी हेच योगायोग बहुतांश वेळा ठरवूनच आणलेले असतात. हे एक उघड गुपित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2018 07:40 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close