पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावर विजेच्या धक्क्यानं केरळच्या तरुणाचा मृत्यू; आत्महत्या केल्याचा संशय

पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावर विजेच्या धक्क्यानं केरळच्या तरुणाचा मृत्यू; आत्महत्या केल्याचा संशय

Suicide in Pune: पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावर गुरुवारी एका उच्च शिक्षित तरुणाचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू (death) झाला आहे. संबंधित तरुणाने मानसिक तणावातून आत्महत्या (Suicide) केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

  • Share this:

पुणे, 16 एप्रिल: पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावर गुरुवारी एका उच्च शिक्षित तरुणाचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू (death) झाला आहे. संबंधित तरुणाने रस्त्यावरील विजेच्या फिडरपिलरचा दरवाजा उघडून त्यातील विद्युत वाहक तारांना आपल्या हातात घेतल्यानंतर तो रस्त्यावर दूरपर्यत फेकला गेला. या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संबंधित तरुणाने मानसिक तणावातून आत्महत्या (Suicide) केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

संबंधित 32 वर्षीय मृत तरुणाचं नाव किरण राजकुमार असून तो मुळचा केरळ राज्यातील रहिवासी आहे. तो पुण्यातील एका नामांकित आर्किटेक्चर कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी करत होता. पण दरम्यानच्या काळात लॉकडाऊनमुळे त्याची नोकरी गेली होती. त्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या तरुणाने गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास लॉ कॉलेज रस्त्यावरील जर्मन बेकरी जवळील विजेचा फिडरपिलरचा दरवाजा उघडला आणि त्यातील हाय होल्टेज विजांच्या तारांना हात लावला. विद्युत तारांचा धक्का बसल्यानंतर संबंधित तरुण रस्त्यावर दूरवर फेकला गेला.

यानंतर रस्त्यावरील प्रत्यक्षदर्शींनी याबाबतची माहिती डेक्कन पोलिसांना दिली. त्याचबरोबर तातडीनं संबंधित युवकाला ससून रुग्णालयात हलवण्यात आलं. पण रुग्णालयात गेल्यानंतर उपचारापूर्वीचं संबंधित युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी  दिली. त्याचबरोबर मृत युवकाच्या हातावर विजेचा शॉक बसल्याचं निशाण असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मृ युवकाच्या खिशातील ओळखपत्रावरून त्याची ओळख पटवली असून या घटनेची माहिती मृत तरुणाच्या वडीलांना देण्यात आली आहे.

हे ही वाचा-रात्रंदिवस मोबाइलवर गेम खेळायचा विद्यार्थी; अचानक मृत्यूमुळे कुटुंबाला धक्का

दैनिक पुढारीने दिलेल्या वृत्तानुसार, डेक्कन पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मित मृत्यू अशी केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. दरम्यान संबंधित फिडरपिलर सुस्थितीत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आहे.  त्यामुळे संबंधित युवकाचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अद्याप संभ्रम तयार झाला आहे. पण प्रत्यक्षदर्शी लोकांनी युवकाने फिडरपिलर उघडून विजेच्या तारांना हात लावल्याची माहिती दिली आहे. या घटनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी महावितरणाच्या अधिकाऱ्यांची मदतही घेतली जात आहे.

Published by: News18 Desk
First published: April 16, 2021, 9:48 PM IST

ताज्या बातम्या