Home /News /news /

अशक्य ते शक्य! केरळला मिळाले 73 लाख डोस, लसीकरण केले 74 लाख, वाया जाण्याचं प्रमाण 0 टक्के

अशक्य ते शक्य! केरळला मिळाले 73 लाख डोस, लसीकरण केले 74 लाख, वाया जाण्याचं प्रमाण 0 टक्के

kerala vaccination drive आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलेल्या प्रशिक्षणामुळं एकही डोस वाया न जाऊ देता कर्मचाऱ्यांनी लसीकरण केलं. त्यामुळं केरळला हे यश मिळवता आलं.

    तिरुअनंतपुरम, 07 मे : केरळ (Kerala) राज्याला केंद्राकडून कोरोनाच्या लसीचे (corona vaccine) 73 लाख डोस मिळाले आणि त्यात त्यांनी 74 लाख नागरिकांचं लसीकरण (vaccination) केलं, यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. पण हे खरं आहे. केरळच्या निपुण नर्समुळं हे शक्य होऊ शकलं आहे. म्हणजे इथं लसीच्या झिरो वेस्टेजबरोबर (vaccine zero wastage) एक विक्रम तयार झाला आहे. एकिकडं देशभरात कोरोनाच्या लसींच्या वेस्टेजच्या बातम्या येत आहेत. पण केरळनं लसींचं वेस्टेज शून्यावर आणलं आणि त्यामुळं त्यांच्याकडं कोरोना लसीचा साठा आजूनही राखीव आहे. हे अशक्य काम शक्य झालं ते केरळच्या नर्सेसमुळं. त्यांना अगदी लसीचा शेवटचा थेंबही वापरता येईल असं प्रशिक्षण देण्यात आलं. कोरोना लसीचे निर्माते हे 10 डोसच्या वायलमध्ये एक डोस एक्स्ट्रा देतात. वेस्टेज झाले तरी संपूर्ण वापर व्हावा म्हणून हा अधिकचा डोस दिला जातो. त्यामुलं या एका वायलद्वारे केरळमध्ये 11 जणांचं लसीकरण करण्यात आलं. (वाचा-‘देशात हे काय चाललंय?’; ऑक्सिजनच्या तुडवड्यावरुन सुनील शेट्टी संतापला) केरळने असे मिळवले यश एका व्यक्तीला 05 मिलीलीटर एवढा डोस दिला जातो. पण 10 डोस असलेल्या कुपीमध्ये कंपनी साधारणपणे 0.55 एमएल किंवा 0.6 एमएल अतिरिक्त औषध देते. त्यामुळं एक डोस सहज वाचतो आणि त्याचाच चांगला वापर केरळच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसंच प्रत्येक रुग्णालयाला ठरावीक डोस दिले जातात आणि त्याचा पूर्ण वापर झाला की नाही, हे तपासलं जातं. तसंच लोकांना ठरावीक वेळ दिली जाते. म्हणजे लसीची बाटली उघडली की सर्व उपस्थित असतील. कारण बाटली उघडल्यानंतर 4 तासांत 10 जणांना डोस द्यावाच लागतो. त्यामुळं 10 पेक्षा कमी लोक असतील तर इथं लसीकरण थांबवलं जातं. मिळाले 73 लाख लसीकरण 74 लाख केरलला लसीकरणासाठी 73,38,806 डोस मिळाले होते. पण त्यातून त्यांनी 74,26,164 डोस लसीकरणासाठी वापरले. म्हणजे 87,358 अतिरिक्त डोसचा वापर त्यांनी केला. मुख्यमंत्री विजयन यांनी स्वत: ट्विट करत याची माहिती दिली. मोदींनीही केलं कौतुक कोरोना लसीचे वेस्टेज न होऊ देणे आणि वापराचा विक्रम केल्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केरळचं कौतुक केलं आहे. त्यांनी केरळच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोनाच्या लसीच्या 10 टक्क्यापर्यंत वाया जाण्याची सूट दिली आहे. काही राज्यांमध्ये हे प्रमाण अगदी दहा टकक्यांपर्यंतही आहे, पण केरळमध्ये हा आकडा 00 टक्के आहे. (वाचा-शरद पवारांनी CM ना लिहिले पत्र, सूचना करत असताना सुप्रिया सुळेंचे Facebook Live) याबरोबरच केरळनं ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यातही मोठं यश मिळवलं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत, ते राज्याला पुरेल एवढ्या ऑक्सिजनची निर्मिती करत होते. मात्र आता इथं अधिकची ऑक्सिजन निर्मिती होत असून तमिळनाडू, कर्नाटक आणि गोव्यात इथून ऑक्सिजन पुरवठा होत आहे. केरळमध्ये सध्या कोरोनाची सर्वात गंभीर स्थिती पाहायला मिळत आहे. निवडणुकांनंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळं 15 दिवसांचा लॉकडाऊन इथं जाहीर करण्यात आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona vaccination, Kerala

    पुढील बातम्या