शर्ट आणि जिन्स घालणाऱ्या महिला देतात तृतियपंथियांना जन्म, केरळच्या प्राध्यापकाचं बेताल वक्तव्य

शर्ट आणि जिन्स घालणाऱ्या महिला देतात तृतियपंथियांना जन्म, केरळच्या प्राध्यापकाचं बेताल वक्तव्य

  • Share this:

तिरूअनंतपुरम,05 एप्रिल : शर्ट आणि जिन्स घालणाऱ्या महिला तृतियपंथियांना जन्म देतात असं अत्यंत बेताल वक्तव्य केरळच्या एका प्राध्यापकानं केलय. रजित कुमार असं या प्राध्यपकाचं नाव असून कलाडीच्या श्री शंकर संस्कृत विश्वविद्यालयात ते बॉटनीचे प्राध्यापक आहेत. कासरगौड इथं विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एका शिबीरात बोलताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी हे बेताल वक्तव्य केलं. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर ज्यांचे पालक चारित्र्यशील नसतात त्या मुलांना ऑटीझम आणि सेलेब्रल पल्सी हे आजार होतात असंही ते बरळले. कुमार यांच्या या वक्तव्याचा केरळमध्ये तीव्र निषेध करण्यात येतोय.

राज्य सरकारनेही या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून कुमार यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचं केरळच्या आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांनी सांगितलं. हे वक्तव्य अंधश्रध्दा निर्माण करणारं असल्याचंही त्या म्हणाल्या. ज्या शिक्षकांनी मुलांना दिशा द्यावी, मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा असते त्या शिक्षकानेच असं वक्तव्य केल्यानं पालक आणि शिक्षण संस्थांनीही तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

 

First published: April 5, 2018, 6:31 PM IST

ताज्या बातम्या