S M L

'या' क्रमांकावरुन फोन काॅल आला तर फोन उचलू नका,बॅलेन्स होईल शुन्य...

जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत +5 आणि +4 क्रमांकावरून येणारे फोन रिसिव्ह करू नका

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2018 10:37 PM IST

'या' क्रमांकावरुन फोन काॅल आला तर फोन उचलू नका,बॅलेन्स होईल शुन्य...

केरळ, 09 जुलै : केरळ पोलिसांनी गेल्या दिवसांपासून सलग 5 आणि 4 या क्रमांकापासून सुरू होणाऱ्या फोन क्रमांकावरून फोन आल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या फोन क्रमांकावरून जर फोन आला तर फोन उचलू नका असा सल्ला केरळ पोलिसांनी दिलाय. या क्रमांकावरून अज्ञात फोन येत आहे. हे फोन काॅल बोलिवियाहून आले आहे कारण तिथला आयएसडी कोड हा 591 आहे.

कुठे सुरू झाला 'सॅमसंग'चा जगातला सर्वात मोठा प्रकल्प?

पोलिसांचं म्हणणं आहे की, एक हायटेक सेल याबद्दल चौकशी करत आहे. पोलिसांनी सध्या या फोन क्रमांकावरून येणाऱ्या फोनचा शोध घेत आहे. सध्या हे फोन कोणत्या देशातून येताय याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. हे फोन काॅल्स का येताय याची तपास सुरू आहे.


पाकिस्तानातल्या एका व्हिडिओनं भारतात घेतला 30 जणांचा बळी

पोलिसांकडे आलेल्या तक्रारीवरुन हे स्पष्ट झालंय की, या क्रमांकावरून जर मिस्ड काॅल आणि या क्रमांकावर काॅल केला तर मोठ्या प्रमाणात फोनचा बॅलेन्स कमी होतोय. अनेक तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत 5 आणि 4 क्रमांकावरून येणारे फोन रिसिव्ह करू नका आणि पुन्हा काॅल करूही नका असं आवाहन केलंय.

विकृतीचा कळस, महिलेच्या गुप्तांगात टाकली मिरची

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2018 10:35 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close