तिरूअनंतपुरम,ता.22 मे: केरळमध्ये निपाह या व्हायरसच्या रूग्णांची सुश्रृषा करणाऱ्या नर्सचा आज मृत्यू झाला. लिनी पुथूसेरी असं या नर्सचं नाव आहे. कोझिकोडच्या एका हॉस्पिटलमध्ये रूग्णांची सेवा करताना तिलाही या व्हायरसची लागण झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. मृत्यूच्या आधी तीनं आपल्या नवऱ्याला हिलेलं ह्रदयस्पर्शी पत्र व्हायरल झालं आहे.
लिनी पुथूसेरी, वय 28 ही गेल्या सहा वर्षांपासून कोझिकडच्या तालुक हॉस्पिलमध्ये नर्स आहे. लिनीला रितूल आणि सिद्धार्थ अशी तिला दोन छोटी मुलं आहेत तर तिचा पती सज्जेश हा बहरिनमध्ये नोकरी करतो. गुरूवारी लहानग्या सिद्धार्थला जेवू घालून लिनी 6 वाजता ड्युटीवर हजर झाली. रात्रभर तीनं निपाहची लागण झालेल्या एकाच कुटूंबातल्या तीन रूग्णांची काळजी घेतली. नंतर या तीनही रूग्णांचा मृत्यू झाला.
सकाळी लिनीलाही ताप भरला. तातडीनं ती कारमध्ये बसून हॉस्पिलमध्ये चेकअपसाठी गेली. या प्रवासात तिनं पती सज्जेशला व्हिडीओ कॉल केला. मात्र आपण गंभीर आहोत असं तीनं नवऱ्याला सांगितलं नाही. लिनीची काळजी वाटल्यानं सज्जेश लगेच बहरिनवरून निघाला आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचून आयसीयू मध्ये त्याने लिनी भेट घेतली.
बातम्
तेच त्यांचं शेवटचं बोलणं होतं. नंतर लिनीला निपाह ची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंर तिला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. तिच्या आई वडिलांनाही तिला भेटता आलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी लिनीचाही मृत्यू झाला. मृत्यूच्या आधी तिनं नवऱ्याला लिहिलेलं पत्र सगळ्यांच्याच मनाचा ठाव घेणारं आहे. यातून तिची कर्तव्यतिष्ठ आणि कामावरचं प्रेम स्पष्ट होते अशी प्रतिक्रिया केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.
लिनीचं मनाचा ठाव घेणारं हेच ते पत्र...
प्रिय सज्जाशेठ,
मी आता शेवटच्या प्रवासाला आहे. तुझी पुन्हा भेट होईल असं वाटत नाही. माफ कर. मी गेल्यानंतर लहान पिलांची काळजी घे. त्यांना आखातात घेऊन जा. त्यांना आपल्या पालकांसारखं इथं एकटं सोडू नकोस. विथ लॉट्स ऑफ लव्ह अँड किसेस.
तुझी
लिनी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: #husband, Hospital, Kerala, Kozhikode, Letter, Lini, Nipah virus, Nurse