दहावीपर्यंत मल्याळम विषय शिकवणं अनिवार्य, केरळ सरकारचा वटहुकूम

दहावीपर्यंत मल्याळम विषय शिकवणं अनिवार्य, केरळ सरकारचा वटहुकूम

येत्या शैक्षणिक वर्षापासून हा वटहुकूम अंमलात येईल, असे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी स्पष्ट केले.

  • Share this:

12 एप्रिल :  राज्यातील सर्व शाळांमध्ये दहावीपर्यंत मल्याळम विषय शिकवणे अनिवार्य असल्याचा वटहुकूम केरळ सरकारने मंगळवारी जारी केला. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा वटहुकूम अंमलात येईल, असे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यपाल पी. सथासिवम यांच्या मंजुरीनंतर सरकारकडून हा वटहुकूम जारी करण्यात आला. यानुसार राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी शैक्षणिक संस्था व सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांशी संलग्न शाळांमध्ये मल्याळम विषय शिकवणे अनिवार्य असणार आहे. मात्र अन्य राज्य किंवा परदेशी विद्यार्थ्यांसाठी दहावीत हा विषय अनिवार्य नसेल, असे विजयन यांनी सांगितले. या वटहुकूमानुसार कोणतीही शाळा मल्याळम बोलण्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बंदी घालू शकत नाही. शिवाय शाळांच्या आवारात मल्याळमव्यतिरिक्त अन्य भाषा वापरण्यास प्रोत्साहन देणारे बोर्ड लावण्यासही मनाई आहे.

First published: April 12, 2017, 1:15 PM IST

ताज्या बातम्या